शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी ठरणार इझ्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान

By admin | Updated: June 1, 2015 14:23 IST

इझ्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान अशी नवी ओळख नरेंद्र मोदी मिळवणार आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ०१ - इझ्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान अशी नवी ओळख नरेंद्र मोदी मिळवणार आहेत. भारत-इझ्रायलचे संबंध सौहार्दाचे असले तरी इझ्रायलचे शत्रू असलेल्या मुस्लीम देशांना व भारतातील मुसलमानांना काय वाटेल या चिंतेने आजतागायत एकाही भारतीय पंतप्रधानाने मित्रराष्ट्र असलेल्या इझ्रायलला भेट दिली नव्हती. मात्र, या वर्षातच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज इझ्रायल, जॉर्डन व पॅलेस्टिनला भेट देतील व नंतर मोदी इस्झायलला भेट देतील असे स्वराज यांनी सांगितले.
भारत व पाकिस्तान संबंधांबाबत बोलताना भारताची भूमिका स्पष्ट आहे आणि त्यात कोणतीही धरसोडगिरी होणार नाही असे सांगताना भारत - पाकिस्तान क्रिकेट डिप्लोमसीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचेही स्वराज यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी इझ्रायलला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरतील याबरोबरच त्यांचे इझ्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी मैत्रीचे संबंध असणे महत्त्वाचे आहे.
भारताने इझ्रायलला १९५० साली मान्यता दिली पण लगेचच संयुक्त राष्ट्रांत इझ्रायलविरोधात मतदान केले. त्यानंतर १९९१ नंतर नरसिंहराव सरकारच्या काळात इझ्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यात आले.
ज्योती बसू, जसवंत सिंग, एस. एम. कृष्णा व लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या भारतीय नेत्यांनी इझ्रायलला भेटी दिल्या. तर मोशे दायान, शिमॉन पेरेझ आदी इझ्रायलच्या नेत्यांनी भारताला भेट दिली आहे.