अखेर लिओनार्डोला ऑस्कर मिळाला

By Admin | Updated: February 29, 2016 10:57 IST2016-02-29T10:47:46+5:302016-02-29T10:57:29+5:30

सहावेळा ऑस्करने हुलकावणी दिल्यानंतर अखेर लिओनार्डो दि कॅप्रिओ'ला यावेळी 'द रेवेनंट' मधील मुख्य भूमिकेसाठी आज सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

Finally Leonardo received an Oscar | अखेर लिओनार्डोला ऑस्कर मिळाला

अखेर लिओनार्डोला ऑस्कर मिळाला

ऑनलाइन लोकमत 

कॅलिफोर्निया, दि. २९ - सहावेळा ऑस्करने हुलकावणी दिल्यानंतर अखेर लिओनार्डो दि कॅप्रिओ'ला यावेळी 'द रेवेनंट' मधील मुख्य भूमिकेसाठी आज सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.  जगभरातील लिओनार्डोच्या चाहत्यांची निदान यावेळी तरी त्याला ऑस्कर मिळावा अशी मनापासून इच्छा होती. यामध्ये भारतीय अभिनेत्री करीना कपूरचाही समावेश होता. लिओनार्डोच्या ऑस्कर विजयाने त्याच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण झाली. 

 
या ऑस्करचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे लिओनार्डो आणि केट विन्सलेट ही जोडी एकत्र आली होती. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'टायटॅनिक' चित्रपटापासून या जोडीचा हॉलिवुडमधील यशस्वी प्रवास सुरु झाला होता. स्टीव्ह जॉब्स चित्रपटातील भूमिकेसाठी केट विन्सलेट सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. 
 
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत विन्सलेटने लिओनार्डो हा पुरस्कार मिळवेल असा अंदाज वर्तवला होता. यावर्षी लिओने पुरस्कार मिळवावा अशी सर्वांची इच्छा आहे. हे त्याचे वर्ष आहे असे विन्सलेट म्हणाली होती.  

Web Title: Finally Leonardo received an Oscar