शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी

By admin | Updated: October 4, 2015 23:31 IST

आपला देशच दहशतवादाचा बळी ठरला असून, पाकिस्तानातील दहशतवादाला भारताची चिथावणी असल्याचा आरोप देशाचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रात करीत असताना जवळपास

वॉशिंग्टन : आपला देशच दहशतवादाचा बळी ठरला असून, पाकिस्तानातील दहशतवादाला भारताची चिथावणी असल्याचा आरोप देशाचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रात करीत असताना जवळपास त्याचवेळी दहशतवाद्यांशी कथित संबंध असलेल्या दोन कॅनेडियन नागरिकांची कॅनडाने पाकिस्तानात हकालपट्टी केल्याची घटना उघडकीस आली आहे.आपल्या देशाला या पाकिस्तानी नागरिकांकडून मोठा धोका निर्माण झाल्याचा ठपका ठेवून कॅनेडियन सरकारने या दोघांना विमानात बसवून पाकिस्तानला धाडल्याचे कॅनडातील एका दैनिकाने म्हटले आहे.पाकिस्तानी नागरिकांची कॅनडातून झालेली ही हकालपट्टी असाधारण नाही. कारण जवळपास याच काळात जगाच्या विविध भागांतून पाकिस्तानी नागरिकांवर अशी कारवाई करण्यात आली. या प्रकरणात हकालपट्टी झालेले पाकिस्तानी नागरिक कायमस्वरूपी कॅनडात राहत होते, हे विशेष. या दोघांना येथे वास्तव्यासाठी देण्यात आलेला व्हिसा रद्द करून त्यांना अक्षरश: इस्लामाबादला जाणाऱ्या विमानात कोंबण्यात आले, असे कॅनडाच्या ‘नॅशनल पोस्ट’ या दैनिकाने म्हटले आहे.कॅनडातील स्टिफन हार्पर सरकारने दहशतवादाशी संबंधित एक वादग्रस्त कायदा संमत केला होता. त्या कायद्यानुसार प्रथमच अशी कारवाई करण्यात आली आहे.जहांजजेब मलिक आणि मोहंमद अकिक अन्सारी, अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही पाकिस्तानात जन्मलेले असून, प्रदीर्घ काळापासून त्यांचे येथे वास्तव्य होते.पाकिस्तान हे दहशतवाद्यांसाठी अड्डा बनत आहे, हे जगाला माहीत आहे. तेथील दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवाया, त्या देशाची ढासळती प्रतिमा यामुळे पाकिस्तानातील अनेक नागरिक अमेरिका आणि कॅनडात वास्तव्यास आले आहेत; पण पाकिस्तानचे धोरण सरकार नव्हे, तर लष्कर ठरवीत असल्याने त्यांची प्रतिमा आणखी बिघडत आहे. (वृत्तसंस्था)