इलॉन मस्क यांची जोडीदार भारतीय वंशाची; कोण आहेत शिवॉन झिलिस? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:12 IST2025-12-01T17:11:36+5:302025-12-01T17:12:38+5:30
Elon Musk: इलॉन मस्क यांनी झेरोधाचे फाउंडर निखील कामतच्या पॉडकास्टमध्ये अनेक खुलासे केले आहेत.

इलॉन मस्क यांची जोडीदार भारतीय वंशाची; कोण आहेत शिवॉन झिलिस? जाणून घ्या...
Elon Musk: उद्योगपती इलॉन मस्क यांनी झेरोधाचे फाउंडर निखील कामतच्या पॉडकास्टमध्ये एक मोठा खुलासा केला आहे. मस्क यांनी सांगितले की, त्यांची पार्टनर शिवॉन झिलिस यांचे मूळ भारतीय आहे. त्यांची आई पंजाबी आहे. त्यामुळेच शिवॉन स्वतःही आपल्या भारतीय मुळांशी घट्ट नाते असल्याचे मानतात.
मुलाचे नाव ‘शेखर’ ठेवले
मस्क यांनी हेदेखील सांगितले की, त्यांना शिवॉनकडून झालेल्या एका मुलाचे नाव ‘शेखर’ ठेवले आहे. हे नाव नोबेल पुरस्कार विजेते भारतीय-अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांना आदरांजली म्हणून दिले आहे.
मस्क-शिवॉन यांना चार मुलं
जुळी मुलं - स्ट्रायडर आणि अझ्युर
मुलगी - आर्केडिया
मुलगा - सेल्डन लाइकुर्गस (मिडिल नेम: शेखर)
मस्क यांच्या मते कुटुंब आणि काम यामध्ये समतोल राखणे आव्हानात्मक असले तरी दोघेही जबाबदाऱ्या उत्तमरीत्या सांभाळतात.
शिवॉन झिलिस कोण आहेत?
जन्म: 1986, ओंटारियो (कॅनडा)
नागरिकत्व: अमेरिका आणि कॅनडा
शिक्षण: येल विद्यापीठ- इकॉनॉमिक्स आणि फिलॉसफी (2008)
करिअर
IBM मध्ये कारकिर्दीची सुरुवात
ब्लूमबर्ग बीटा मध्ये पार्टनर - एआय आणि मशीन इंटेलिजन्स स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक
2016 मध्ये OpenAI च्या सुरुवातीच्या टीममध्ये प्रवेश - इथेच मस्क यांच्याशी पहिली भेट
सध्या Neuralink मध्ये Director of Operations & Special Projects
फोर्ब्सने त्यांना ‘30 अंडर 30’ यादीत स्थान दिले आहे. एआय आणि न्यूरोटेक क्षेत्रातील जगातील अग्रगण्य तज्ज्ञांमध्ये त्यांची गणना होते.