शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मानवी अवशेषांवरुन इजिप्त एअरच्या विमानात स्फोटाचा निष्कर्ष

By admin | Updated: May 24, 2016 17:27 IST

इजिप्त एअरच्या MS804 विमान दुर्घटनेत सापडलेल्या मानवी अवशेषांवरुन घातपात झाल्याची शक्यता इजिप्तच्या फॉरेन्सिक तज्ञांनी व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

कैरो, दि. २४ - इजिप्त एअरच्या MS804  विमान दुर्घटनेत सापडलेल्या मानवी अवशेषांवरुन घातपात झाल्याची शक्यता इजिप्तच्या फॉरेन्सिक तज्ञांनी व्यक्त केली आहे. विमान उड्डाणवस्थेत असताना झालेल्या स्फोटामुळे विमान खाली कोसळले असा निष्कर्ष इजिप्तच्या फॉरेन्सिक तज्ञांनी काढला आहे. मागच्या गुरुवारी पॅरिसहून कैरोला निघालेले हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानात ६६ प्रवासी होते. सर्वांचा मृत्यू झाला आहे. 
 
इजिप्तशियन तपास पथकातील अधिका-यांनी कैरो येथील शवागरात जाऊन मृतदेहांची पाहणी केल्यानंतर हा निष्कर्ष काढला. आतापर्यंत मानवी शरीराचे ८० तुकडे कैरोला आणण्यात आले आहेत. या तुकडयांमध्ये शरीराचा एकही अवयव पूर्णावस्थेत नाही. स्फोट नेमका कशामुळे झाला ते सांगता येणार नाही असे अधिका-याने सांगितले. 
 
तांत्रिक बिघाडापेक्षा दहशतवादी हल्ल्याची शक्यता जास्त असल्याचे इजिप्तच्या तपास अधिका-यांचे मत आहे. अल-वतन या कैरोच्या वर्तमानपत्राने विमान उड्डाणावस्थेत असताना स्फोटामध्ये उडवून दिल्याचे अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. आतापर्यंत जे मानवी अवशेष सापडले आहेत ते हातापेक्षा मोठे नसल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.  
 
पॅरिसहून कैरोला निघालेलं हे विमान दुपारी २.४५ वाजता रडारवरुन गायब झाले होते. रडारशी संपर्क तुटला तेव्हा हे विमान ३७ हजार फूट उंचीवर होते.