शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:02 IST

मागील काही वर्षापासून चीनमध्ये लोकसंख्या घटत असल्याचे दिसत आहे. यावर आता चीनने नवीन फर्मान काढले आहे.

मागील काही वर्षापासून चीनमध्ये लोकसंख्या दर घटत असल्याचे दिसत आहे. यावर आता चीन सरकार अॅक्शनमोडवर आले आहे. चीन मधील सरकारने आता लोकांना नवीन फर्मान दिले आहे. आपल्या नागरिकांना उघडपणे नोकरी सोडा, लग्न करा आणि मुले जन्माला घाला असे सांगत आहे. घटत्या लोकसंख्येमुळे चिंतेत असलेला चीन आता तरुणांना लग्न करण्यासाठी आणि मुले जन्माला घालण्यासाठी विविध सवलती देत ​​आहे. देशातील अनेक प्रांतांमध्ये लग्नाची रजा ३ दिवसांवरून ३० दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर

चीनच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या सिचुआन प्रांतात लग्नाची रजा ३ वरून २० दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही लग्नापूर्वी वैद्यकीय तपासणी केली तर तुम्हाला आणखी ५ दिवसांची रजा मिळेल. म्हणजेच एकूण २५ दिवसांची रजा, तीही पूर्ण पगारासह. हा प्रस्ताव सध्या जून महिन्यापर्यंत जनतेसाठी खुला आहे.

...म्हणून सरकारने सुट्ट्या वाढवल्या

कन्फ्यूशियसची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेडोंग प्रांतातही लग्नाची रजा आता १८ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. शांक्सी आणि गांसु सारख्या प्रांतांनी ती आणखी ३० दिवसांपर्यंत वाढवली आहे. सध्या चीनमध्ये केंद्रीय पातळीवर फक्त ३ दिवसांच्या लग्नाच्या रजेची तरतूद आहे, ही रजा १९८० पासून सुरू आहे.

चीनमध्ये लग्न करणाऱ्या लोकांची संख्या सतत कमी होत आहे. २०२५ च्या पहिल्या तिमाहीत फक्त १.८१ मिलियन जोडप्यांनी त्यांचे लग्न नोंदणीकृत केले, हे गेल्या वर्षीपेक्षा ८% कमी आहे. २०२३ मध्ये थोड्याशा वाढीनंतर, आकडेवारी पुन्हा घसरली आणि आता ही पातळी १९८० नंतरची सर्वात कमी आहे.

विवाहाचे प्रमाण कमी झाले

कमी विवाहांचा थेट संबंध घटत्या जन्मदराशी आहे. अभ्यास आणि करिअरमधील व्यस्तता आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा विचार यामुळे पारंपारिक विवाहाची संकल्पना आणखी कमी झाली आहे.

कंपन्यांना दिले आदेश

चीन आता विवाह नोंदणीची प्रक्रिया सोपी करत आहे. आता कोणत्याही शहरात लग्नाची नोंदणी करता येते, हुकोउची आवश्यकता नाही. यासोबतच, प्रसूती आणि पितृत्व रजा देखील वाढविण्यात येत आहे. यासाठी आता सरकारने कंपन्यांना आदेश दिले आहेत. 

टॅग्स :chinaचीनSocial Viralसोशल व्हायरल