शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व असले तरी हद्दपार केले जाणार; डोनाल्ड ट्रम्प 227 वर्षे जुना 'तो' कायदा लागू करणार..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 14:50 IST

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 227 वर्षे जुना कायदा लागू करण्याचा विचार करत आहेत.

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर काढण्याची मोहीम तीव्र केली आहे. त्यांनी देशाची सत्ता हाती घेतल्यापासून व्हेनेझुएला, भारत, ब्राझील, मेक्सिकोसह अनेक देशांतील हजारो लोकांना हद्दपार केले आहे. आता असे सांगण्यात येत आहे की, ट्रम्प 227 वर्षे जुना कायदा आणण्याच्या तयारीत आहेत, ज्यामुळे सर्व गैर-अमेरिकन लोकांना देशातून बाहेर काढण्याचा धोका आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा कायदा लागू केल्यास अमेरिकेसह संपूर्ण जगात खळबळ उडेल. 

काय आहे हा कायदा?मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प एलियन एनिमी ऍक्ट, 1798 पुन्हा लागू करू इच्छितात. हा कायदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना युद्धकालीन अधिकार देतो. या अंतर्गत राष्ट्रहिताच्या नावाखाली राष्ट्रपती कोणत्याही गैर-अमेरिकन नागरिकाला देशातून बाहेर काढू शकतात. हा कायदा युद्धकाळासाठी असला तरी आता डोनाल्ड ट्रम्प यांना सामान्य परिस्थितीतही त्याची अंमलबजावणी करायची आहे.

या 227 वर्षे जुन्या कायद्यात काय?अमेरिकेचा हा 227 वर्ष जुना कायदा सांगतो की, जेव्हा जेव्हा अमेरिका आणि इतर कोणत्याही देशामध्ये युद्ध होईल, तेव्हा राष्ट्राध्यक्षांना गैर-अमेरिकन वंशाच्या लोकांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असेल. विशेषत: ते 14 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांबाबत निर्णय घेऊ शकतात आणि त्यांना देशातून हद्दपारही केले जाऊ शकते. या कायद्यानुसार बाहेर काढल्या जाणाऱ्या लोकांना 'शत्रू एलियन' घोषित केले जाऊ शकते.

अवैध स्थलांतरितांबाबत ट्रम्प आक्रमकराष्ट्राध्यक्ष ट्रम्प हा कायदा सामान्य परिस्थितीत लागू करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेत याची जोरदार चर्चा आहे. सत्तेत आल्यापासून ट्रम्प अवैध स्थलांतरितांविरोधात खूप आक्रमक पवित्रा घेत आहेत. मात्र, अमेरिकेवर कोणत्याही देशाकडून हल्ला झालेला नसताना ट्रम्प यांना या कायद्याची अंमलबजावणी करणे कठीण जाईल, असेही कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारत