शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

"देवानं वाचवलं...", प्राणघातक हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 18:51 IST

Donald Trump : पेनसिल्व्हेनिया येथील बटलरमधील एका प्रचार सभेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या संपूर्ण घटनेवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनियामध्ये जीवघेणा हल्ला झाला. पेनसिल्व्हेनिया येथील बटलरमधील एका प्रचार सभेदरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या कानात गोळी लागली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या संपूर्ण घटनेवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "आपण प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार, कारण केवळ देवानेच अकल्पनीय घटना घडण्यापासून रोखले. आम्ही घाबरणार नाही. वाईट गोष्टींचा सामना करण्याचा निर्धार करू. या घटनेत जे जखमी झाले ते बरे व्हावेत, यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तसेच, त्या नागरिकाची आठवण राहील, ज्याला वाईट पद्धतीने मारले गेले."

पुढे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "यावेळी, आपण एकजूट राहणे आणि अमेरिकन म्हणून आपले खरे चरित्र दाखवणे हे नेहमीपेक्षा महत्त्वाचे आहे. दृढनिश्चयी राहा आणि वाईटाला जिंकू देऊ नका. मी माझ्या देशावर प्रेम करतो आणि तुम्हा सर्वांवर प्रेम करतो. या आठवड्यात विस्कॉन्सिनमधून देशवासियांसोबत बोलण्यास उत्सुक आहे."

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर असा झाला हल्ला...डोनाल्ड ट्रम्प यांची बटलर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या सभेच्या मंचापासून जवळपास १२० मीटर अंतरावर एका कंपनीच्या छतावर हल्लेखोर लपून बसला होता. डोनाल्ड ट्रम्प  भाषण करत असतानाच हल्लोखोराने त्यांच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. हे लक्षात येताच या सभेत एकच गोंधळ उडाला. यावेळी सुरक्षा रक्षक गोळीबारामुळे सावध झाले आणि मंचा शेजारी असलेल्या एका स्नायपरने हल्लोखोरावर निशाणा साधला आणि त्याचा खात्मा केला. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका