शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 13:42 IST

donald trump mark sawaya special envoy to iraq: डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: या संबंधीचे घोषणा केली

donald trump mark sawaya special envoy to iraq: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही महिन्यांपासून अनेकवेळा असे निर्णय घेत आहेत, ज्यामुळे वाद निर्माण होताना दिसत आहे. आता ट्रम्प यांनी गांजा विक्रीचे आरोप असलेल्या आणि अंमली पदार्थांच्या प्रचारात सहभागी असलेल्या एका व्यावसायिकाची इराकमधील विशेष दूत म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार, अध्यक्ष ट्रम्प यांनी मिशिगनमधील एक प्रसिद्ध व्यापारी मार्क सवाया यांची इराकमधील विशेष दूत म्हणून नियुक्ती केली आहे.

सवाया हे इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर म्हणून प्रसिद्ध आहेत. ट्रम्प यांनी सवाया यांच्याबद्दल एक पोस्ट केली आहे. त्यांना एक हुशात व्यक्ती म्हणून वर्णन करताना ट्रम्प यांनी लिहिले आहे की, "सवाया इराकसाठी विशेष दूत म्हणून काम करतील हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. अमेरिकेच्या संबंधांबद्दल आणि या प्रदेशातील त्यांच्या संपर्कांबद्दल मार्क यांची सखोल समज अमेरिकन लोकांच्या हितांना पुढे नेण्यास मदत करेल."

सवाया यांच्यावर गांजा विक्रीचा आरोप

'द इंडिपेंडेंट'ने सवाया बद्दल एक वृत्त दिले होते. अहवालात असे म्हटले आहे की, सवाया मिशिगनमध्ये गांजा विक्री दुकानांची एक साखळी चालवतात आणि इंस्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मद्वारे या विक्रीचा मोठ्या प्रमाणात प्रचार करतात. अहवालात असेही म्हटले आहे की, सवाया स्वतः डेट्रॉईटच्या पश्चिमेकडील हेझेल पार्क आणि लिओनोइसमध्ये 'लीफ अँड बड' नावाच्या गांजा रिटेल विक्रीच्या साखळी दुकानांचे मालक आहेत. २०१८ पासून मिशिगनमध्ये गांजा विक्री कायदेशीर आहे, त्यामुळे तो ते उघडपणे विक्री करतात.

इराक-अमेरिका संबंध सुधारण्याचा प्रयत्न

सवाया यांना सरकारमध्ये काम करण्याचा कोणताही अनुभव नाही, त्यामुळे त्यांना इतके उच्चपदस्थ पद कसे देण्यात आले याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. २००३ मध्ये सद्दाम हुसेनच्या हत्येपासून अमेरिकेने इराकी राजकारणावर वर्चस्व गाजवले आहे, परंतु अलीकडे दोघांमधील संबंध बिघडले आहेत. अमेरिकेला शह देण्यासाठी इराकने अलीकडेच इराणशी करार केला आहे. अशा परिस्थीतीत सवाया यांची भूमिका काय असेल, याकडे सारे लक्ष आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Appoints Cannabis Entrepreneur as Special Envoy to Iraq!

Web Summary : Donald Trump appointed Mark Sawaya, a cannabis businessman, as special envoy to Iraq. Sawaya, known for his cannabis retail chain, lacks government experience. This appointment raises questions amidst strained US-Iraq relations and Iraq's growing ties with Iran.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका