शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाही, ७ देशांवरही कडक निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 08:24 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १२ देशांच्या नागरिकांच्या अमेरिकेत प्रवेशावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

America Travel Ban: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून विविध निर्णयांचा धडाका सुरुच आहे. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील काही देशांची चिंता वाढवणारा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी इराण आणि अफगाणिस्तानसह १२ देशांच्या नागरिकांच्या अमेरिकेत प्रवेशावर बंदी घातली. ट्रम्प यांनी बुधवारी ही घोषणा केली. यासह सात देशांमधील लोकांच्या प्रवेशावरही ट्रम्प यांनी कठोर प्रवास निर्बंध लादले आहेत.  दहशतवादी आणि इतर धोक्यांपासून संरक्षणासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक असल्याचे म्हणत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात एका निर्णयावर स्वाक्षरी केली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १२ देशांमधील लोकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आता या देशांमधील लोकांना अमेरिकेत प्रवास करता येणार नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळातही अनेक देशांमधल्या लोकांवर प्रवास बंदी घातली होती. मात्र, नंतर ती उठवण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी बंदीची घोषणा केली. अमेरिकेच्या सुरक्षेचा हवाला देत ट्रम्प यांनी सात देशांविरुद्धही कडक कारवाई केली आहे.

ट्रम्प यांनी अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इक्वेटोरियल गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या देशांच्या नागरिकांच्या अमेरिका प्रवासावर बंदी घातली आहे. ट्रम्प यांनी या देशांव्यतिरिक्त, बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या सात इतर देशांमधील लोकांच्या प्रवेशावर अंशतः बंदी आणली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजल्यापासून प्रवास बंदी लागू होईल.

"मला अमेरिकेची आणि तिच्या लोकांच्या राष्ट्रीय सुरक्षेचे आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी काम करावे लागेल," असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी एक कार्यकारी आदेश जारी केला होता, ज्यामध्ये राज्य आणि गृह सुरक्षा विभाग आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालकांना अमेरिकेच्या सुरक्षेसंदर्भात एक अहवाल तयार करण्यास आणि विशिष्ट देशांमधून येणारे लोक राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करतात का हे तपासून घेण्यास सांगितले होते. त्या अहवालानंतर, १२ देशांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे आणि ७ देशांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका