ट्रम्प दावोसला निघालेले, 'एअर फोर्स वन' तासाभरातच माघारी परतले...; तांत्रिक बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 10:34 IST2026-01-21T10:33:29+5:302026-01-21T10:34:02+5:30

Donald Trump Air Force One technical glitch: दावोसला जाताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विमानाचा वीजपुरवठा खंडित झाला. एअर फोर्स वनच्या तांत्रिक बिघाडानंतर बॅकअप विमानाने प्रवास. पहा सविस्तर वृत्त.

Donald Trump Air Force One technical glitch: Trump leaves for Davos, 'Air Force One' returns within an hour...; Technical failure | ट्रम्प दावोसला निघालेले, 'एअर फोर्स वन' तासाभरातच माघारी परतले...; तांत्रिक बिघाड

ट्रम्प दावोसला निघालेले, 'एअर फोर्स वन' तासाभरातच माघारी परतले...; तांत्रिक बिघाड

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'एअर फोर्स वन' या अतिसुरक्षित विमानाला उड्डाण केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला. स्विट्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेसाठी रवाना झालेले हे विमान विद्युत बिघाडामुळे अवघ्या एका तासात वॉशिंग्टनच्या जॉइंट बेस अँड्र्यूज येथे परतले. ट्रम्प यांनी नंतर बॅकअप विमानाने आपला प्रवास पूर्ण केला.

विमानातील प्रत्यक्षदर्शी पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, टेकऑफनंतर काही वेळातच प्रेस केबिनमधील दिवे अचानक बंद झाले. उड्डाणाच्या अर्ध्या तासानंतर विमानात "विद्युत तांत्रिक समस्या" असल्याचे सांगण्यात आले आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून विमान परत वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. वॉशिंग्टनमध्ये सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांचे शिष्टमंडळ दुसऱ्या विमानाने दावोसकडे रवाना झाले.

४० वर्षे जुन्या विमानांचा पेच
सध्या 'एअर फोर्स वन' म्हणून वापरली जाणारी दोन्ही बोइंग ७४७ विमाने सुमारे चार दशके जुनी आहेत. बोइंग कंपनी नवीन विमाने तयार करत असली तरी त्या प्रकल्पाला विलंब होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी कतरच्या शाही कुटुंबाने ट्रम्प यांना एक आलिशान बोइंग ७४७-८ जंबो जेट भेट दिले होते. सध्याच्या बिघाडानंतर, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लीविट यांनी मिश्किलपणे टिप्पणी केली की, "सध्याच्या स्थितीत कतरचे ते जेट अधिक चांगला पर्याय वाटत आहे."

दावोसमध्ये ट्रम्प काय बोलणार?
दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर ट्रम्प यांची जागतिक आर्थिक परिषदेतील (WEF) ही पहिलीच उपस्थिती आहे. आज ते दावोसमध्ये अमेरिकेचे आर्थिक धोरण, कमी झालेले गॅस दर आणि मजबूत अर्थव्यवस्थेवर भाषण करणार आहेत. या ५६ व्या वार्षिक बैठकीत १३० हून अधिक देशांचे सुमारे ३,००० जागतिक नेते सहभागी झाले आहेत.

Web Title : ट्रम्प का एयर फ़ोर्स वन तकनीकी खराबी के कारण उड़ान के बाद वापस लौटा।

Web Summary : ट्रम्प को दावोस ले जा रहा एयर फ़ोर्स वन तकनीकी खराबी के कारण वापस लौटा। बिजली की खराबी के कारण विमान को वाशिंगटन वापस लौटना पड़ा। ट्रम्प ने एक बैकअप विमान से अपनी यात्रा जारी रखी। पुरानी फ्लीट ने बहस छेड़ दी, कतर के उपहार का संभावित अपग्रेड के रूप में उल्लेख किया गया।

Web Title : Trump's Air Force One returns after takeoff due to technical glitch.

Web Summary : Air Force One, carrying Trump to Davos, returned due to a technical issue. An electrical malfunction forced the plane back to Washington. Trump continued his journey on a backup aircraft. The aging fleet sparks debate, with a Qatar gift mentioned as a potential upgrade.