शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

१ ग्रॅम युरेनियमची 'पॉवर' किती असते माहित्येय? केवढा मोठा 'धमाका' होऊ शकतो वाचा! ट्रम्प यांच्या रडारवर ४०० किलो युरेनियम का हे कळेल...

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: March 30, 2026 17:30 IST

इराण या युरेनियमचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी करेल, अशी भीती अमेरिकेला वाटते. "इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवू देणार नाही," अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. यामुळेच, इराणच्या अणुकेंद्रांमध्ये दडवून ठेवलेले हे ४०० किलो युरेनियम बाहेर काढण्यासाठी अमेरिका एका मोठ्या मिलिट्री ऑपरेशनची आखणी करत असल्याचे वृत्त आहे. तर जाणून घेऊयात युरेनियमच्या शक्तीसंदर्भात... 

श्रीकृष्ण न. अंकुश -अमेरिका-इस्रायल आणि इराणयुद्ध सुरू होऊन एक महिना उलटून गेला आहे. मात्र अद्यापही युद्धाची धग कायम आहे. हे युद्ध केव्हा थांबेल? हे सांगणे अवघड. आता अमेरिकन लष्कर इराणवर जमीनी हल्ला करू शकते, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. इराणकडे असलेल्या ४०० किलोग्रॅम संवर्धित (Enriched) युरेनियमवर ताबा मिळवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प केव्हाही आपल्या लष्कराला आदेश देऊ शकतात, असेही बोलले जात आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचा अधिकृत निर्णय झालेला नाही. 

काय आहे अमेरिकेचा प्लॅन...? -इराण या युरेनियमचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी करेल, अशी भीती अमेरिकेला वाटते. "इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवू देणार नाही," अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. यामुळेच, इराणच्या अणुकेंद्रांमध्ये दडवून ठेवलेले हे ४०० किलो युरेनियम बाहेर काढण्यासाठी अमेरिका एका मोठ्या मिलिट्री ऑपरेशनची आखणी करत असल्याचे वृत्त आहे. तर जाणून घेऊयात युरेनियमच्या शक्तीसंदर्भात... 

१ ग्रॅम युरेनियममधून निर्माण होणारी ऊर्जा थक्क करणारी? -खरेतर, अगदी एका ग्रॅम युरेनियममध्ये साठलेली ऊर्जा ही कोळसा किंवा तेलासारख्या पारंपारिक इंधनांच्या तुलनेत खूप अधिक असते. अगदी विज्ञानाच्याच भाषेतच सांगायचे तर, एक ग्रॅम युरेनियममधून मिळणारी ऊर्जा, ही केवळ रासायनिक प्रक्रिया नसून ती अणुविखंडन (Nuclear Fission) प्रक्रियेतून निर्माण होते. एक ग्रॅम युरेनियम पूर्णपणे विखंडित झाल्यास, त्यातून निर्माण होणारी ऊर्जा ही थक्क करणारी असते.

१ ग्रॅम युरेनियममधून किती ऊर्जा मिळू शकते? -- कोळशाशी तुलना केल्यास, १ ग्रॅम युरेनियममधून मिळणारी ऊर्जा ही साधारणपणे ३ टन (३००० किलो) उच्च दर्जाच्या कोळशापासून मिळणाऱ्या ऊर्जेएवढी असते.- तेलाशी तुलना केल्यास, हे प्रमाण सुमारे २३०० लिटर तेलाच्या ऊर्जेएवढे आहे.- गणिती भाषेत सांगायचे झाल्यास, एक ग्रॅम युरेनियमच्या विखंडनातून सुमारे ८.२ x १० चा १० वा घात ज्यूल्स एवढी ऊर्जा मुक्त होते.महत्त्वाचे म्हणजे, केवळ एक ग्रॅम युरेनियमचा 'अणूबाँब' बनवता येत नाही. अणूबाँबचा स्फोट होण्यासाठी 'क्रिटिकल मास' (Critical Mass) नावाच्या किमान वजनाची आवश्यकता असते, जे युरेनियमसाठी साधारणपणे १५ ते ५२ किलोच्या दरम्यान असू शकते.

किती तीव्र असू शकतो एका ग्रॅम युरेनियमचा स्फोट? -TNT शी तुलना करता, १ ग्रॅम युरेनियमच्या विखंडनातून मिळणारी ऊर्जा ही सुमारे २० टन TNT (एक शक्तिशाली स्फोटक) च्या स्फोटाच्या ऊर्जेएवढी असते.

किती मोठा असू शकतो विनाश? -  २० टन TNT चा स्फोट एखाद्या मोठ्या इमारतीला अथवा परिसराला जमीनदोस्त करण्यासाठी पुरेसा असतो. मात्र, अणूबाँबमध्ये ही प्रक्रिया साखळी पद्धतीने (Chain Reaction) घडते, यामुळे तीव्रता कैक पटीने वाढते. महत्वाचे म्हणजे, अणू उर्जेचा स्फोट केवळ उष्णता आणि प्रकाश निर्माण करत नाही, तर तो घातक किरणोत्सारही सोडतो, जो अनेक दशके संबंधित परिसरात राहू शकतो.

थोडक्यात सांगायचे तर, १ ग्रॅम युरेनियम शांततापूर्ण कामासाठी, उदाहरणार्थ वीज निर्मितीसाठी वापरल्यास, ते एका कुटुंबाला कित्येक वर्ष पुरेल इतकी वीज देऊ शकेल, पण त्याचा स्फोट झाल्यास तो एका मोठ्या इमारतीलाही नष्ट करण्याची क्षमता ठेवते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Understanding Uranium: Power, Potential Blast, and Trump's Concerns Explained

Web Summary : One gram of uranium packs immense energy, equaling three tons of coal. While not bomb-ready alone, 400kg worries the US due to Iran's nuclear ambitions. A gram's fission mirrors 20 tons of TNT, devastating buildings and releasing radiation. Used peacefully, it powers homes for years.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणAmericaअमेरिकाWarयुद्धBlastस्फोट