अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये 'सोनिक वेपन' वापरले? हे हत्यार कानातून रक्त काढते
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:21 IST2026-01-12T18:18:12+5:302026-01-12T18:21:12+5:30
व्हेनेझुएलामध्ये निकोलस मादुरोला पकडताना अमेरिकन सैन्याने एका सोनिक वेपनचा वापर केला, यामुळे सैनिकांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला, रक्ताच्या उलट्या झाल्या. यामुळे सैनिकांना हालचाल करता आली नाही.

अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये 'सोनिक वेपन' वापरले? हे हत्यार कानातून रक्त काढते
काही दिवसापूर्वी व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने हल्ला केला. या हल्ल्यानंतर व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना अटक केली, या हल्ल्यानंतर वेगवेगळे दावे करण्यात आले. आता न्यूयॉर्क पोस्टमधील एका वृत्तात व्हेनेझुएलाच्या एका सैनिकाने अमेरिकेने सोनिक वेपनचा वापर केल्याचा दावा केला आहे. निकोलस मादुरोला पकडण्यासाठी छाप्यादरम्यान अमेरिकन सैन्याने एका अज्ञात ध्वनिक किंवा निर्देशित-ऊर्जा शस्त्राचा वापर केला. या शस्त्रामुळे रडार आणि सैनिकांचा गोंधळ उडाला.
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
हल्ल्यानंतर व्हेनेझुएला मोठा गोंधळ उडाला होता. सोनिक वेपनचा हल्ला खूप तीव्र ध्वनी लाटेसारखे होते. मला अचानक माझे डोके आतून फुटत असल्याचे वाटत होते. हा आघात तात्काळ आणि तीव्र होता. आमच्या सर्वांच्या नाकातून रक्त येऊ लागले. काहींना रक्ताच्या उलट्या होत होत्या. आम्ही जमिनीवर पडलो, हालचाल करू शकत नव्हतो." हा दावा ध्वनिलहरी शस्त्रांच्या जगात एक नवीन वाद निर्माण करत आहे, ही प्राणघातक नसलेली परंतु अत्यंत प्रभावी मानली जाते.
सोनिक शस्त्रे म्हणजे काय?
सोनिक हत्यार याला ध्वनिक किंवा अल्ट्रासोनिक शस्त्रे म्हणतात, अशी शस्त्रे आहेत जी शत्रूला जखमी करण्यासाठी किंवा निष्क्रिय करण्यासाठी ध्वनीचा वापर करतात. ते निर्देशित-ऊर्जा शस्त्रेचा एक वर्ग आहेत, तिथे ऊर्जा लक्ष्यावर निर्देशित केली जाते.
हे तीन प्रकरचे असते
उच्च-तीव्रतेचे श्रवणीय ध्वनी शस्त्रे- लाँग रेंज अकॉस्टिक डिव्हाइस (LRAD), हे १५० डेसिबल पर्यंत आवाज निर्माण करते, हे सामान्य संभाषणापेक्षा १०० पट जास्त असते.
इन्फ्रासाउंड शस्त्रे- २० हर्ट्झपेक्षा कमी वारंवारता असलेला आवाज, हा मानवी कानाला ऐकू येत नाही परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो.
अल्ट्रासोनिक शस्त्रे- २० kHz पेक्षा जास्त वारंवारता. त्या लक्ष्यांवर परिणाम करतात आणि ऐकू येत नाहीत.