शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत तेलवाहिनीवर सायबर हल्ला, विभागीय आणीबाणी जाहीर, तेलपुरवठा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 06:10 IST

सर्वात मोठ्या तेलवाहिनीच्या यंत्रणेवरच घाला घालण्यात आला असून, त्यामुळे विभागीय आणीबाणी जाहीर करण्याची नामुष्की अमेरिकी प्रशासनावर ओढवली आहे.

सायबर हल्ला म्हटले की, मुंबईत काही तास ठप्प झालेला वीजपुरवठा आठवतो. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यामुळे मुंबईतील वीजपुरवठा ठप्प झाल्याचे अलीकडेच निदर्शनास आले. असाच सायबर हल्ला अमेरिकेतही झाला आहे. सर्वात मोठ्या तेलवाहिनीच्या यंत्रणेवरच घाला घालण्यात आला असून, त्यामुळे विभागीय आणीबाणी जाहीर करण्याची नामुष्की अमेरिकी प्रशासनावर ओढवली आहे.

- ५कोटी लोकांना या तेलवाहिनीच्या सेवेचा लाभ होतो.- लांबी ८,८५० किमी, अमेरिकेतील १८ राज्यांमधून ती जाते.- ३० लाख बॅरलहून अधिक तेल वाहून नेण्याची या वाहिनीची क्षमता आहे. त्यात विमानांसाठी लागणाऱ्या इंधनापासून पेट्रोल आणि डिझेल इत्यादींपर्यंतचा समावेश आहे.

कोणी केला सायबर हल्ला?- डार्कसाईड रॅन्समवेअर या हॅकर्सच्या  गटाने हा हल्ला घडवून आणला आहे.- कोलोनियल पाईपलाईनच्या सॉफ्टवेअर प्रणालीवर डार्कसाईड रॅन्समवेअरच्या हॅकर्सनी हल्ला करून त्यांचा १०० जीबीचा डेटा ओलिस ठेवला आहे.- हॅकर्सनी कंपनीकडे २० लाख डॉलर्सची मागणी केली आहे. 

खंडणी न दिल्यास कंपनीचा १०० जीबीचा डेटा लीक केला जाईल, अशी धमकीही देण्यात आली आहे.

परिणाम काय?- कोलोनियल पाईपलाईन कंपनीवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे तेलवाहिनीच्या सर्व यंत्रणा ठप्प पडल्या आहेत.- त्यामुळे इंधन पुरवठा खंडित झाला असून, १८ राज्यांना त्याची झळ बसली आहे.- या सर्व अडचणीतून मार्ग काढण्यासाठी अमेरिकी प्रशासनाच्या - सर्व यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.- इंधन पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी रस्तामार्गे वाहतूक करण्यात येत आहे.- परंतु, वाहतुकीला उशीर होणे अपेक्षित असल्याने इंधनाच्या किमतीत दोन ते तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पPetrolपेट्रोलUSअमेरिकाcyber crimeसायबर क्राइम