शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

CoronaVirus News: संपूर्ण जगानं पाकिस्तानकडून शिकावं; कोरोना रोखल्याबद्दल WHOकडून तोंडभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 4:30 PM

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पाकिस्तानला यश; जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रशंसा

इस्लामाबाद: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्ताननं केलेल्या प्रयत्नांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) संचालक टेड्रोस अधनोम यांनी पाकिस्ताननं उचललेल्या पावलांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. सध्या संपूर्ण जगानं पाकिस्तानकडून शिकण्याची गरज असल्याचं टेड्रोस म्हणाले. पाकिस्ताननं कोरोना विरुद्धच्या लढाईत वापरलेल्या रणनीतीचं टेड्रोस यांनी कौतुक केलं. पाकिस्ताननं कोरोनाशी लढण्यासाठी अनेक वर्षे जुन्या असलेल्या पोलिओ पॅटर्नचा वापर केला.लढ्याला यश! स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा घरोघरी जाऊन लहान मुलांना पोलिओची लस देणाऱ्या पाकिस्तानमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचं टेड्रोस यांनी कौतुक केलं. पाकिस्ताननं याच आरोग्य साखळीचा वापर कोरोनाशी संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी केला. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लवकर नियंत्रणात आली. पाकिस्तानात सध्याच्या घडीला कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख इतकी आहे.IMAचं ठरलं! आता खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर 'एवढ्या' रुपयांत होणार उपचारजगातील अनेक देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात लवकर यश मिळालं. यापैकी बहुतांश देशांनी याआधी SARS, MERS, पोलिओ, इबोला, फ्लू यांच्यासारख्या साथीच्या आजारांचा सामना केला होता. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी केलेल्या कौतुकावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे माजी विशेष सहाय्यक डॉ. जफर मिर्झा यांनी भाष्य केलं. पाकिस्ताननं कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाल्याचं मिर्झा म्हणाले.जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी कोरोनावर नियंत्रण मिळवल्याबद्दल पाकिस्तानसह आणखी काही देशांचंही कौतुक केलं. थायलंड, कंबोडिया, जपान, न्यूझीलंड, रिपब्लिक ऑफ कोरिया, सेनेगल, इटली, स्पेन आणि व्हिएतनाम या देशांनी कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची त्यांनी प्रशंसा केली. पाकिस्तानात आतापर्यंत ३ लाख ९५५ जणांचा कोरोनाची लागण झाली. यापैकी ६ हजार ३७३ जणांचा मृत्यू झाला. २ लाख ८८ हजार ५३६ जणांनी कोरोनावर मात केली. तर सध्याच्या घडीला ६ हजार ४६ जणांवर उपचार सुरू आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाPakistanपाकिस्तान