IMAचं ठरलं! आता खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर 'एवढ्या' रुपयांत होणार उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 01:35 PM2020-09-12T13:35:58+5:302020-09-12T13:59:54+5:30

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने सरकारने ठरविलेल्या शुल्कावर उपचार करण्यास सज्ज झाले आहे.

gorakhpur city now corona patients will be treated in this amount ima | IMAचं ठरलं! आता खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर 'एवढ्या' रुपयांत होणार उपचार

IMAचं ठरलं! आता खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर 'एवढ्या' रुपयांत होणार उपचार

Next

खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवरच्या उपचाराचे दर शासनाने निश्चित केले आहेत. एका दिवसात एका पेशंटला जास्तीत जास्त 15 हजार रुपये उपचारासाठी मोजावे लागतील. कोणतेही रुग्णालय निश्चित दरापेक्षा रुग्णांकडून अधिक शुल्क आकारू शकणार नाही.

दिवसाला फक्त 15 हजार रुपये रुग्णांना द्यावे लागणार 
यापूर्वी सरकारने दोन श्रेणीतील रुग्णांची फी दररोज आठ आणि 13 हजार रुपये निश्चित केली होती. ठिकठिकाणी फीपेक्षा जास्त पैसे घेतल्याच्या बर्‍याच ठिकाणी तक्रारी आल्या. आता सरकारने शुल्क तीन श्रेणींमध्ये निश्चित केले आहे. 15 हजार रुपये जास्तीत जास्त आहे. ज्यांची तब्येत कमी खराब आहे आणि त्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्यासाठी दिवसातून आठ आणि 13 हजार रुपये दर निश्चित केले गेले आहेत. या दरात बीपी आणि शुगरवरही उपचार केले जातील. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने दर निश्चित केले असून, खासगी रुग्णालयांना आता ठरविलेल्या शुल्कावर रुग्णावर उपचार करावे लागणार आहेत.

रुग्णांनाही ही सुविधा मिळणार
पॅनेसियाचे डॉक्टर अजय शुक्ला म्हणाले की, लक्षणे नसलेल्या आठ हजार रुग्णांकडून सरकारने ठरविलेले दर घेतले जातील. त्यांना आवश्यकतेनुसार ऑक्सिजनची सुविधा पुरविली जाईल. आयसीयू सुविधा रुग्णांना 13 हजार रुपयांना देण्यात येणार आहे. 15 हजार रुपयांना आयसीयूसह  व्हेंटिलेटरची सुविधा देण्यात येणार आहे. या दरामध्ये रुग्णांना जेवण, काही आवश्यक चाचण्या, औषध, नर्सिंग शुल्काचा समावेश असेल. सीएमओ डॉ. श्रीकांत तिवारी म्हणाले की, खासगी रुग्णालय कोरोना रुग्णांवर शासनाने निश्चित केलेल्या दराने उपचार करेल. त्यापेक्षा जास्त रुग्णांना पैसे द्यावे लागणार नाहीत.

इंजेक्शनसाठी स्वतंत्र पैसे द्यावे लागतील
शासनाने काही इंजेक्शन्स रुग्णांना देण्याचे दर निश्चित केले आहे, अशी माहिती डॉ. अजय शुक्ला यांनी दिली. त्यामध्ये रेमिडेसिव्हर आणि टोकलिझुमब यांचा समावेश आहे. हे इंजेक्शन आवश्यकतेनुसार रुग्णांना दिले जाईल. परंतु यासाठी त्यांना स्वतंत्र पैसे मोजावे लागतील. सरकारने ही इंजेक्शन पॅकेजमध्ये जोडलेली नाहीत. एखादा रुग्ण किडनीसह गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर आयुष्मान योजनेतील लाभार्थ्यांना ठरलेल्या दराने त्याच्यावर उपचार केले जातील. त्यांच्याकडून जादा शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय कोरोना रुग्ण आयुष्मान योजनेस पात्र ठरल्यास त्यातून अधिक शुल्क घेतले जाणार नाही.
 

Web Title: gorakhpur city now corona patients will be treated in this amount ima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.