शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus News: ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता जगात जाणवणार कोरोनावरील 'या' औषधाची टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 7:53 AM

अमेरिकेच्या निर्णयामुळे जगभरात औषधाची टंचाई जाणवणार; कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये अडचणी येणार

वॉशिंग्टन: चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं आहे. जगातील कोरोना रुग्णांचा आकडा १ कोटीच्या पुढे गेला आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५ लाखांहून अधिक आहे. अमेरिकेत कोरोनानं हाहाकार माजवला आहे. कोरोनावरील लस अद्याप आलेली नाही. मात्र रेमडेसिवीर औषधामुळे कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अमेरिकेनं जगातील रेमडेसिवीरचा संपूर्ण साठा खरेदी केला आहे. त्यामुळे आता जगात रेमडेसिवीर औषधाची टंचाई जाणवणार आहे.अमेरिकेत गेल्या २४ तासांत तब्बल ५२ हजार कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या २७ लाखांच्या पुढ गेली. जगातील जवळपास २५ टक्के कोरोना रुग्ण एकट्या अमेरिकेत आहेत. त्यामुळे अमेरिकेनं जगातील रेमडेसिवीरचा संपूर्ण साठा विकत घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता इतर देशांना पुढील दोन ते तीन महिने रेमडेसिवीर औषध मिळू शकणार नाही.अमेरिकन कंपनी जिलाद सायन्सेस रेमडेसिवीर औषध तयार करते. हे औषध कोरोनावरील उपचारादरम्यान १०० टक्के यशस्वी होत असल्याचं अद्याप दिसून आलेलं नाही. मात्र इतर औषधांपेक्षा ते जास्त परिणामकारक ठरत असल्याचं निरीक्षणातून समोर आलं आहे. यामुळे कोरोनाचा रुग्ण लवकर बरा होतो. याशिवाय या औषधाचे साईड इफेक्ट्सदेखील कमी आहेत. ट्रम्प प्रशासनानं मे महिन्यात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिवीर वापर करण्यास परवानगी दिली होती.आता अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागानं मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरचा साठा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका रेमडेसिवीर औषधाचे ५ लाखांहून अधिक कोर्स खरेदी करणार आहे. याआधी जिलाद सायन्सेसनं रेमडेसिवीर औषधाचा मोठा साठा अमेरिकेला दान म्हणून दिला आहे. त्यातच आता अमेरिकेनं रेमडेसिवीरचा संपूर्ण साठा खरेदी केल्यानं जगभरात या औषधाची टंचाई जाणवणार आहे.कोरोनाविरुद्धच्या लढ्याला तब्बल १00 दिवस पूर्ण; आयुष्यच बदललं, वाचा काय घडलं?देशात कोरोना साथीचा मोठा फैलाव; एका दिवसात १८ हजारांहून जास्त रुग्ण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका