शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

CoronaVirus News: अमेरिकेकडून चीनची हवाई नाकाबंदी; ट्रम्प यांच्या निर्णयानं ड्रॅगनची कोंडी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 9:27 PM

चीनहून येणारी सर्व विमानं रोखण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय

वॉशिंग्टन: कोरोना विषाणूवरून ताणले गेलेले अमेरिका आणि चीनचे संबंध दिवसागणिक आणखी बिघडत आहेत. चीनच्या विरोधात आता अमेरिकेनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. चीनहून येणारी सर्व विमानं रोखण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनानं घेतला आहे. अमेरिकेच्या वाहतूक विभागानं आज याबद्दलची घोषणा केली. त्यामुळे आता चीनमधून येणाऱ्या विमानांना अमेरिकेत उतरता येणार नाही. विमान प्रवासाबद्दल अमेरिका आणि चीननं काही नियम ठरवले होते. त्याबद्दल त्यांनी सामंजस्य करारदेखील केला होता. या करारातल्या नियमांचं पालन करण्यात चीन अपयशी ठरत असल्याचा दावा करत ट्रम्प प्रशासनानं चीनहून अमेरिकेला येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे जगातल्या दोन बड्या अर्थव्यवस्था आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. त्यांचे संबंध दिवसेंदिवस तणावपूर्ण होऊ लागले आहेत. चीनवरून येणाऱ्या विमानांना १६ जूनपासून अमेरिकेत उतरता येणार नाही. अमेरिकेच्या डेल्टा एअरलाईन्स आणि युनायटेड एअरलाईन्सनं याच महिन्यात चीनला जाणाऱ्या विमानसेवा पुन्हा सुरू केली. कोरोना संकट काळातही चिनी विमान कंपन्यांची विमानं सेवा सुरू होती. त्यांची विमानं अमेरिकेच्या विविध शहरांमध्ये उतरत होती. मात्र आता अमेरिकेनं चीनमधून येणाऱ्या विमानांवर निर्बंध लादले आहेत. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. कोरोना प्रकरणात चीनच दोषी असल्याचा आरोप त्यांनी अनेकदा केला आहे. मात्र चीननं या आरोपांचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. चीनला एकटं पाडण्याच्या दृष्टीनं अमेरिकेनं वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. जी-७ देशांच्या परिषदेत भारतानं सहभागी व्हावं, यासाठी कालच ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विशेष आमंत्रण दिलं. जी-७ परिषदेतील देशांची संख्या ११ वर नेण्याचा ट्रम्प यांचा मानस आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीनAmericaअमेरिका