शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
2
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
3
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
4
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
5
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
6
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
8
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
9
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
10
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
12
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
13
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
14
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
15
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
16
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
17
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
18
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
19
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
20
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

coronavirus:...म्हणून या शहरातील महापौरांनी घेतलं मृत्यूचं सोंग, शवपेटीत राहिले लपून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 4:45 PM

सध्या कोरोना विषाणूने सगळीकडे हाहाकार माजवलेला आहे, मात्र या देशातील महापौरांनी चक्क पोलिसांपासून वाचण्यासाठी मृत्यूचे सोंग घेतले.

लीमा  - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगात थैमान घातले आहे. जगातील छोट्या-मोठ्या अनेक देशांना कोरोनाने विळखा घातला आहे. दक्षिण अमेरिकेतील एक छोटा देश असलेल्या पेरूमध्येही कोरोनाने हाहाकार उडवलेला आहे. दरम्यान, याच पेरू देशात तंतारा शहरातील महापौरांनी अटकेची कारवाई टाळण्यासाठी चक्क मृत्यूचे सोंग घेतल्याचे समोर आले आहे.

तंतारा शहराचे महापौर रोलांडो यांच्यावर लॉकडाऊनचे उल्लंघन करून मित्रांसोबत मद्यापान केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र पोलीस त्यांना अटक करण्यासाठी पोहोचल्यावर त्यांनी जे पाहिले ते धक्कादायक होते.

पोलिसांचे पथक त्यांना पकडण्यासाठी पोहोचल्यावर रोलांडो यांनी मृत्यू झाल्याचे सोंग घेतले आणि ते शवपेटीमध्ये लपून बसले. त्यांनी तोंडावर मास्क लावलेला होता. पोलिसांनी शवपेटी उघडून त्यांचे छायाचित्र टिपले. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. जेव्हा त्यांना अटक करण्यात आली. तेव्हाही ते दारूच्या नशेतच होते.

या कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, रोलांडो हे मित्रांसोबत बसून मद्यपान करत होते. हा नियम्ंचा भंग होता. तसेच रोलांडो यांच्यावर कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले संकट गांभीर्याने न घेतल्याचा आणि परिसरात संरक्षणाची योग्य व्यवस्था न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.  दरम्यान, कोरोनाच्या आपत्तीदरम्यान योग्य व्यवस्थापन न केल्याने स्थानिक लोक या महापौरांवर नाराज आहेत.पेरूमध्ये गेल्या ६६ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झालेली नाही. पेरूमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून, येथील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार २० पर्यंत पोहोचला आहे. तसेच देशात ३ हजार २४ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूJara hatkeजरा हटके