शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

CoronaVirus : दुबईत अडकलेल्या भारतीय गर्भवती महिलेची सुप्रीम कोर्टात धाव, यासाठी मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 9:08 PM

CoronaVirus : लॉकडाऊनमुळे सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली आहे.

दुबई: जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी भारतात केंद्र सरकारने 3 मेपर्यंत लॉकडाऊन लागू केले आहे. या लॉकडाऊनमुळे सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली आहे. 

यातच एका दुबईतील २७ वर्षीय भारतीय गर्भवती  महिलेने तिच्या प्रसूतीसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या महिलेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत तिने प्रसूतीसाठी घरी म्हणजेच भारतात जाण्यास कोर्टाने  मदत करावी, असे म्हटले आहे. 

गल्फ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, मुळच्या केरळ राज्यातील असलेल्या गीता श्रीधरन यांनी सांगितले की, त्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रसूतीसाठी भारतात परतायचे आहे. रिपोर्टनुसार, गीता श्रीधरन या पती नितीन चंद्रन यांच्यासोबत दुबईत राहत आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. यामध्ये भारतात परतण्यासाठी मदत मागितली आहे. 

कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात विमान सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. कोरोनावर उपाय योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने कडक पावले उचलली आहे. लॉकडाउनचा हा दुसरा टप्पा सुरू आहे. येत्या 27 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहे. या चर्चेत कोरोना लढ्याची पुढची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारतात वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे. यातच दिलासादायक बाब म्हणजे, भारतातील 78 जिल्हे कोरोना फ्री झाले आहे. मात्र, गेल्या 24 तासांत 1409 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत देशात 21 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDubaiदुबईSupreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत