शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

Good news: लवकरच संपणार कोरोनाचा कहर?; "वर्षभरात येऊ शकते कोरोना व्हॅक्सीन"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 6:44 PM

सध्या जगभरात जवळपास 100 कोरोना व्हॅक्सीन डेव्हलपमेन्ट वेगवेगळ्या पातळीवर आहेत.

ठळक मुद्देजगाला एका वर्षात अथवा त्याहूनही कमी काळात कोरोनावरील व्हॅक्सीन मिळू शकते.टेड्रोस घेब्रेयेसस म्हणाले, व्हॅक्सीनन उपलब्ध करणे आणि नंतर ती सर्वांना वितरित करणे एक आव्हान असेल.सध्या जगभरात जवळपास 100 कोरोना व्हॅक्सीन डेव्हलपमेन्ट वेगवेगळ्या पातळीवर आहेत.

 वॉशिंग्टन : वैज्ञानिकांचा अंदाज आहे, की जगाला एका वर्षात अथवा त्याहूनही कमी काळात कोरोनावरील व्हॅक्सीन मिळू शकते, असे जागतीक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर व्हॅक्सीन विकसित करणे, तिची निर्मिती करणे आणि नंतर वितरण करणे, यासाठी वैश्विक सहकार्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

युरोपीयन संसदेच्या पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य आणि अन्न सुरक्षा संदर्भातील बैठकीत टेड्रोस घेब्रेयेसस म्हणाले, व्हॅक्सीनन उपलब्ध करणे आणि नंतर ती सर्वांना वितरित करणे एक आव्हान असेल. यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असते.

सध्या जगभरात जवळपास 100 कोरोना व्हॅक्सीन डेव्हलपमेन्ट वेगवेगळ्या पातळीवर आहेत. ट्रेडोस म्हणाले, या महामारीने जागतीक एकी किती महत्वाची आहे, यावर प्रकाश टाकला आहे. तसेच, आरोग्याकडे एक किंमत म्हणून न पाहता, गुंतवणूक म्हणून बघायला हवे, असेही ते म्हणाले.

जगातील सर्वच देशांना, प्राथमिक आरोग्य सेवा आणि संकटाच्या स्थितीसाठी पूर्णपणे तयार असायला हवे. त्यासाठी त्यांनी काम करायला हवे, असेही टेड्रोस म्हणाले. याच वेळी त्यांनी जागतीक स्थरावर, युरोपीयन संघाच्या आवश्यकतेवरही भर दिला. 

जागतीक महामारीच्या काळात सर्वांकडूनच चुका झाल्याचे टेड्रोस यांनी मान्य केले आहे. तसेच, डब्ल्यूएचओच्या वतीने एक स्वतंत्र पॅनलच्या माध्यमाने महामारीसंदर्भात देण्यात आलेल्या प्रतिक्रियांचे मूल्यांकन केले जाईल. जेणे करून झालेल्या चुका सुधारता येतील. हे पॅनल लवकरच आपले काम सुरू करेल.

7 दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटींवर पोहोचणार -भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 485,122 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 95 लाख लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, येत्या 7 दिवसांत म्हणजेच पुढच्या आठवड्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल 1 कोटींवर पोहोचणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे.

अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूच्या साथीने पुन्हा डोके वर काढले असून, आता या आजाराने दक्षिण व पश्चिमेकडील राज्यांना ग्रासले आहे. राजकारणी तसेच निर्बंध पाळण्यात कुचराई करणारे नागरिक यांच्यामुळे ही साथ अधिकाधिक भागांत पसरत आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: सर्दी-खोकल्याच्याही आधी दिसू शकतात कोरोनाची 'ही' अतिगंभीर लक्षणं, नव्या अभ्यासाचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाdoctorडॉक्टर