शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

coronavirus: भारत, अमेरिकेत कोरोना सुसाट, पण या देशाने संसर्गाला आणले पूर्णपणे नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 6:08 PM

न्यूझीलंडमध्ये २६ फेब्रुवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण भेटला होता. तर १ मे रोजी देशातील समूह संसर्गातून बाधा झालेला शेवटचा रुग्ण सापडला होता. दरम्यान तेव्हापासून आतापर्यंत देशात समूह संसर्गाची एकही घटना घडलेली नाही.

ठळक मुद्देकाही देशांनी कोरोनाच्या या साथीवर मोठ्या शिताफीने नियंत्रण मिळवले आहे. या देशांपैकीच एक देश आहे तो म्हणजे न्यूझीलंड समूह संसर्गाविना न्यूझीलंडने १०० दिवसदेखील पूर्ण केले आहेत न्यूझीलंडने स्पष्टपणे ही रणनीती अपेक्षेहून लवकर अवलंबली आणि आक्रमक पद्धतीने त्याचे पालन केले

नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी एकदम कमी दिसून येत आहे. एकीकडे भारत आणि अमेरिकेसारख्या देशाता कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनलेली आहे. मात्र काही देशांनी कोरोनाच्या या साथीवर मोठ्या शिताफीने नियंत्रण मिळवले आहे. या देशांपैकीच एक देश आहे तो म्हणजे न्यूझीलंड.न्यूझीलंडमध्ये २६ फेब्रुवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण भेटला होता. तर १ मे रोजी देशातील समूह संसर्गातून बाधा झालेला शेवटचा रुग्ण सापडला होता. दरम्यान तेव्हापासून आतापर्यंत देशात समूह संसर्गाची एकही घटना घडलेली नाही. तसेच समूह संसर्गाविना देशाने १०० दिवसदेखील पूर्ण केले आहेत.दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखून साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी न्यूझीलंडने तीन प्रकारचे उपाय केल्याचे समोर आले आहे. या उपाययोजना पुढीलप्रमाणे.१ - कोरोनाचा देशात प्रवेश होऊ नये यासाठी देशा्च्या सीमांवर नियंत्रण.२ - समूह संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि फिजिकल डिस्टंसिंगची चोख अंमलबजावणी३ - कोरोनाच्या अधिकाधिक चाचण्या घेण्यावर भर, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि क्वारेंटाइनचा प्रभावी वापरवरीलप्रमाणे सामूहिक उपाय अवलंबून युरोप आणि उत्तर अमेरिकेतील श्रीमंत देशांपेक्षा कोरोनाची रूग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याचे न्यूझीलंडने सांगितले. न्यूझीलंडने स्पष्टपणे ही रणनीती अपेक्षेहून लवकर अवलंबली आणि आक्रमक पद्धतीने त्याचे पालन केले. तसेच सुनियोजित पद्धतीने केलेले लॉकडाऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रभावी ठरले.मात्र भारतात नेमकी याउलट परिस्थिती आहे. २४ मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला आता १३६ दिवस उलटत आले आहेत. या काळात अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार हळूहळू खुले केले जात आहेत. मात्र यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या बेसुमार पद्धतीने वाढत आहे.

टॅग्स :New Zealandन्यूझीलंडcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतUnited Statesअमेरिका