Coronavirus Confirmed cases of COVID-19 worldwide exceed 4,22,614 over 18892 died SSS | Coronavirus : कोरोनाचा कहर! जगभरात तब्बल 18,892 लोकांना गमवावा लागला जीव

Coronavirus : कोरोनाचा कहर! जगभरात तब्बल 18,892 लोकांना गमवावा लागला जीव

नवी दिल्ली कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊनलागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 18,892 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 4,22,614 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 1,08,879 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

चीनमध्ये 3,281,इटलीत6, 820, अमेरिकेत 775, इराणमध्ये 1,934, स्पेनमध्ये 2,991, जर्मनीमध्ये 159, फ्रान्समध्ये 1,100 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 536 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जागतिक महामारी बनलेल्या कोरोना व्हायरसमुळे इटलीत हाहाकार माजला आहे. चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. आतापर्यंत इटलीत6 हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.

कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनानंतर चीनमध्ये'हंता' व्हायरसने एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरससारखा हंता व्हायरस घातक नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण कोरोनासारखा हा हवेद्वारे पसरत नाही. हा व्हायरस उंदीर, खार यांच्या संपर्कात आल्यास होतो. उंदरांनी घरात आतबाहेर केल्यास हा व्हायरस पसरतो. जर कोणी निरोगी असेल आणि तो जर हंता व्हायरसच्या संपर्कात आला तर त्याला लागण होते, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलटी, डायरिया आदी लक्षणे दिसून येतात.

 महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: आनंदाची बातमी! राज्यातील कोरोनाचे पहिले दोन रुग्ण बरे झाले; हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज मिळणार

Coronavirus: कोरोना व्हायरसच्या धास्तीनं लग्न ठरलेल्या २७ वर्षीय युवकाने लिहिलं थेट पंतप्रधानांना पत्र, म्हणाला...

Coronavirus : २१ दिवस लॉकडाऊन; पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वपूर्ण घोषणा

Coronavirus : पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडणार; इम्रान खान यांच्याकडून लॉकडाऊनची घोषणा

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus Confirmed cases of COVID-19 worldwide exceed 4,22,614 over 18892 died SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.