शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: एवढ्यात सुटका नाही? कोरोना अजून वाढणार, ओमायक्रॉननंतर आणखी व्हेरिएंट येणार, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 23:05 IST

Corona Virus: Omicron हा कोरोनाचा शेवटचा व्हेरिएंट नसेल. तर कोरोनाचे अजूनही काही व्हेरिएंट येणार, असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, प्रत्येक संसर्ग विषाणूला म्युटेशन करण्याची क्षमता बाळगतो.

बोस्टन - सुरुवातीला कोरोना, नंतर डेल्टा, आता ओमायक्रॉन, कोरोनाच्या साथीमुळे वेगवेगळे व्हेरिएंट संपूर्ण जगामध्ये लोकांची झोप उडवत आहेत. आता हा विषाणू जगातील लोकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. कोरोना विषाणूबाबत अभ्यासामधून दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. आता तर कोरोना विषाणूबाबत तज्ज्ञांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

ओमायक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरिएंट नसेल. तर कोरोनाचे अजूनही काही व्हेरिएंट येणार, असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, प्रत्येक संसर्ग विषाणूला म्युटेशन करण्याची क्षमता बाळगतो. ओमायक्रॉन स्वत:ला वाढवू शकतो. त्यांनी सांगितले की, व्हॅक्सिन आणि नैसर्गिकरीत्या मिळालेल्या इम्युनिटीनंतरही हा विषाणू लोकांना बाधित करत आहे. याचा अर्थ हा आहे की,  हा विषाणू अधिकाधिक लोकांमध्ये पुढेही विकसित होऊ शकतो.

मात्र तज्ज्ञांनी हेही सांगितले आहे की, त्यांना कोरोनाच्या पुढच्या व्हेरिएंटमध्ये कशाप्रकारची लक्षणे दिसतील याबाबत माहिती नाही आहे. ओमायक्रॉनच्या दुसऱ्या टप्प्यात येणारी साथ हा एक सौम्य आजार असेल आणि लसीकरण त्याविरोधात काम करेल, याची काहीही हमी देता येत नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

बोस्टन विद्यापीठाचे साथरोगतज्ज्ञ लियोनार्डो मार्टिनस यांनी सांगितले की, वेगाने पसरत असल्याने ओमायक्रॉनला अधिक म्युटेशन तयार करण्याची संधी मिळेल. त्यामुळे अधिकाधिक व्हेरिएंट येण्याची शक्यता वाढणा आहे. नोव्हेंबरच्या मध्यामध्ये हा व्हेरिएंट सापडल्यापासून जगभरात तो आगीसारखा पसरला आहे. ओमायक्रॉन हा व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएँटच्या तुलनेत चारपट अधिक गतीने बाधित करतो, असे संशोधनामधून समोर आले आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील साथरोज आजार तज्ज्ञ डॉ. स्टुअर्ट कॅम्बेल यांनी सांगितले की, सातत्याने आणि दीर्घकाळापर्यंत संसर्ग झाल्यामुळे नव्या व्हेरिएंटच्या निर्मितीची शक्यता निर्माण होत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य