शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

चीनची भिंत आली आडवी

By admin | Updated: June 25, 2016 03:15 IST

एनएसजीचे (आण्विकपुरवठादार समूह) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना मुख्यत: चीनच्या विरोधामुळे यश आले नाही.

सेऊल : एनएसजीचे (आण्विकपुरवठादार समूह) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना मुख्यत: चीनच्या विरोधामुळे यश आले नाही. चीनने खोडा घातल्याने आणि अन्य काही देश भारताच्या विरोधात गेल्याने भारताच्या महत्त्वाकांक्षांवर पाणी फेरले गेले. अर्थात, भारताने नाव न घेता यासाठी चीनला जबाबदार ठरविले आहे. एका देशाने सातत्याने अडथळे निर्माण केल्याने हे प्रयत्न यशस्वी झाले नसल्याचे भारताने म्हटले आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ३८ देशांनी भारताला सदस्यत्वासाठी पाठिंबा दिला होता. एनएसजीच्या ४८ सदस्यीय समूहात सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोर्चेबांधणी केली होती; पण चीनचा विरोध कायम राहिल्याने यात यश मिळू शकले नाही. चीनच्या पाठिंब्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी त्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चीनच्या राष्ट्रपतींची गुरुवारी ताश्कंदमध्ये भेट घेतली होती. मात्र प्रयत्नांना यश आले नाही आणि चीनची विरोधाची भूमिका कायम राहिली. एनएसजीच्या गुरुवारी सुरू झालेल्या दोन दिवसीय बैठकीचा येथे शुक्रवारी समारोप झाला. त्यानंतर परराष्ट्र विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री सदस्यत्व व एनपीटीच्या मुद्यावर आम्ही तीन तास चर्चा केली; पण एका देशाने या प्रकरणात अडथळे आणले. (वृत्तसंस्था)एनएसजीने यासंबंधात स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, भारताच्या बाबतीत कुठलाही ‘अपवाद’ होणार नाही. तथापि, ही चर्चा पुढेही चालू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भारताने एनपीटीवर (अण्वस्त्र प्रसारबंदी करार) स्वाक्षरी केलेली नसल्याने चीन आणि अन्य काही देशांनी भारताच्या सदस्यत्वाला विरोध केला. अर्थात भारताला सदस्यत्व देण्याच्या मुद्द्यावर यापुढेही चर्चा होत राहील.