China Coronavirus 17-day-old baby overcomes coronavirus symptoms SSS | China Coronavirus : चमत्कार! अवघ्या 17 दिवसांच्या बाळाने केली कोरोनावर मात 

China Coronavirus : चमत्कार! अवघ्या 17 दिवसांच्या बाळाने केली कोरोनावर मात 

ठळक मुद्देकोरोनामुळे तब्बल 2,663 जणांचा मृत्यू झाला आहे.अवघ्या 17 दिवसांच्या बाळाने कोरोनावर मात केल्याची घटना समोर आली आहे. कोणतेही उपचार न घेता या बाळाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली

बीजिंग - चीनमध्येकोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 2,663 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण कोरियात कोरोनामुळे रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 30 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. कोरोनो व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असून, 40 हून अधिक देशांनी हाय अलर्ट घोषित केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तर जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. मात्र याच दरम्यान एक आश्चर्यजनक गोष्ट समोर आली आहे. 

अवघ्या 17 दिवसांच्या बाळाने कोरोनावर मात केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे कोणतेही उपचार न घेता या बाळाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. या 17 दिवसांच्या बाळाच्या शरीरात कोरोना व्हायरस नसून त्याचं आरोग्य उत्तम असल्याची माहिती मिळत आहे. सीओ सीओ (Xiao Xiao) असं या बाळाचं नाव आहे. चीनमध्ये एका गर्भवती महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे गर्भातच बाळाला कोरोनाचा संसर्ग झाला. 

गर्भवती महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिलेने एका बाळाला जन्म दिला. त्यावेळी त्याला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे बाळाला लहान मुलांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. बाळाला डॉक्टरांच्या ऑब्जरवेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. जास्त त्रास होत नसल्यामुळे बाळाला कोणतीच औषधं देण्यात आली नाहीत. त्यानंतर बाळाने कोरोनावर मात केल्याची बाब समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

रविवारी (24 फेब्रुवारी) कोरोनामुळे 150 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या 150 पैकी 149 नागरिक हे हुबेई प्रांतातील असल्याची माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच 409 नवीन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. रोग नियंत्रण केंद्राच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग झालेले 129 नवीन रुग्ण दाएगू शहरातील शिंचेओंजी चर्चशी संबंधित आहेत. कोरियात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती मून जेई-इन यांनी कोरोना व्हायरसचे गांभीर्य लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच कोरोनाबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून आगामी काही दिवस महत्त्वाचे असणार असल्याचं देथील मून यांनी सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Violence : दिल्ली हिंसाचाराबाबत पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले...

Balakot Air Strike: बालाकोट एअर स्ट्राईकला वर्षपूर्ती, काय झालं होतं 'त्या' मध्यरात्री?; वाचा संपूर्ण कहाणी 

Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू

Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण  

Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: China Coronavirus 17-day-old baby overcomes coronavirus symptoms SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.