शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

युद्धविराम हवेत विरला; क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ले सुरूच, इराणच्या हल्ल्यांमुळे इस्रायल हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 06:21 IST

इस्रायलमधील प्रमुख तेल अवीव शहरासह विविध भागांवर थेट हल्ले झाल्याने नुकसान आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

दुबई : इराणने मंगळवारी इस्रायल तसेच आखाती देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरूच ठेवत संघर्ष अधिक तीव्र केला. इस्रायलमधील प्रमुख तेल अवीव शहरासह विविध भागांवर थेट हल्ले झाल्याने नुकसान आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबविण्यासाठी अमेरिका-इराण चर्चा सुरू असल्याचा दावा केला होता; पण सोमवारी तसेच मंगळवारीही इराणने कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट करत हा दावा फेटाळला. अमेरिका खार्ग बेट ताब्यात घेण्यासाठी वेळ घेत आहे. त्यांचे मरिन सैनिक युद्धक्षेत्रात पोहोचत आहेत, म्हणून ट्रम्प यांनी ५ दिवसांसाठी हल्ले थांबवल्याची रणनीती आखल्याचे इराणचे म्हणणे आहे.

इस्रायलवर तीव्र हल्ले

इराणकडून मंगळवारी पहाटेपासून इस्रायलवर अनेक टप्प्यांत क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. तेल अवीवच्या मध्यवर्ती भागात १०० किलो स्फोटक असलेले क्षेपणास्त्र कोसळल्याने मोठे नुकसान झाले. अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, परिसरात धुराचे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही जण किरकोळ जखमी झाले. 

बचाव पथकांनी घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू केले. पण, स्थानिकांमध्ये हल्ल्यांमुळे भीती पसरली आहे. आमच्या डोळ्यांदेखत क्षेपणास्त्र हल्ल्याने इमारत उद्ध्वस्त पाहायला मिळाली व हवेत धुळीचे मोठे लोट पसरल्याचे दिसले अशी प्रतिक्रिया योल मोशे या बचाव पथकातील स्वयंसेवकाने दिली.

इस्रायलचे दक्षिण लेबनॉन, बैरूतवर हल्ले

हिजबुल्लाच्या हल्ल्यांचे प्रत्युत्तर देत इस्रायलने लेबनॉनमधील बैरूतच्या दक्षिण उपनगरांवर हवाई हल्ले केले. हे हल्ले हिजबुल्लाच्या पायाभूत सुविधांवर होते, असा दावा केला गेला. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने, एका निवासी इमारतीवरील हल्ल्यात किमान दोन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

‘आमच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले’

इराणमधील ‘फार्स’ या निमलष्करी वृत्तसंस्थेने इस्फहान येथील नैसर्गिक वायू प्रकल्प आणि खोर्रमशहर येथील गॅस पाइपलाइनवर आधारित वीज प्रकल्पावर मंगळवारी हल्ले करण्यात आल्याचा आरोप केला. या हल्ल्यांमुळे नुकसान झाल्याचे इराणचे म्हणणे आहे. 

‘पूर्ण विजय मिळेपर्यंत लढणार’

इराणचे सशस्त्र दल ‘पूर्ण विजय मिळेपर्यंत’ लढत राहतील, असा इशारा इराणच्या खातम अल अंबिया केंद्रीय मुख्यालयाचे मेजर जनरल अली अब्दुल्लाबी अलिबादी यांनी मंगळवारी अमेरिकेला दिला. 

ट्रम्पची घोषणा अन् सेन्सेक्स उसळला

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्यांना तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा केल्याने सेन्सेक्स तब्बल १,३७२ अंकांनी उसळत ७४,०६८ वर बंद झाला, तर निफ्टीने २२,९१२ चा टप्पा गाठला. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ceasefire Collapses: Iran's Attacks Shake Israel; Missile, Drone Strikes Continue

Web Summary : Iran intensified conflict with missile and drone strikes on Israel, including Tel Aviv. Despite US claims of talks, Iran denied discussions. Israel retaliated, hitting Lebanon. Iran vowed to fight until victory. Markets surged on Trump's halt announcement.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIsraelइस्रायलIranइराण