बस-टँकरची धडक; ६२ ठार, चार जखमी

By Admin | Updated: January 12, 2015 00:04 IST2015-01-12T00:04:19+5:302015-01-12T00:04:19+5:30

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मुख्य रस्त्यावर खचाखच भरलेली बस तेलाच्या भरधाव येणाऱ्या टँकरवर आदळली असून, टक्कर होताच बसने पेट घेतला.

Bus-tanker; 62 killed, four injured | बस-टँकरची धडक; ६२ ठार, चार जखमी

बस-टँकरची धडक; ६२ ठार, चार जखमी

कराची : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मुख्य रस्त्यावर खचाखच भरलेली बस तेलाच्या भरधाव येणाऱ्या टँकरवर आदळली असून, टक्कर होताच बसने पेट घेतला. या अपघातात ६२ जण ठार झाले असून, चारजण जखमी झाले आहेत. देशाच्या इतिहासातील हा सर्वात घातक असा अपघात ठरला आहे.
कराचीचे पोलीस आयुक्त शोएब सिद्दीकी यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बस कराचीहून शिकारपूरला जात होती. रविवारी सकाळी ही बस तेलाच्या टँकरला धडकली. दोन्ही वाहनांच्या चालकांच्या चुकीमुळे हा अपघात झाला. तेलाचा टँकर भरधाव वेगात होता, तर बस इतकी खचाखच भरली होती की टपावरही प्रवासी बसले होते. जिना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटरमधील अतिदक्षता खात्याच्या प्रमुख सिमीजमाली यांनी दिलेल्या माहितीनुसार ६२ मृतदेह आले असून, त्यात महिलांची संख्या मोठी आहे, चारजण जखमी आहेत. रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. बसमध्ये ८० प्रवासी होते. (वृत्तसंस्था)

 

 

Web Title: Bus-tanker; 62 killed, four injured