शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

'फोटो डिलीट करा, जर्सी जाळून टाका'; अफगाणिस्तानातील महिला फुटबॉलर्ससाठी माजी कर्णधाराचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 7:05 PM

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या कब्जामुळे तेथील महिला सर्वात जास्त चिंतेत आहेत. अफगाणिस्तान महिला फुटबॉल संघाच्या माजी कर्णधारानं खेळाडूंना आपला जीव वाचवण्यासाठी केलं मोठं आवाहन

ठळक मुद्देअफगाणिस्तानात तालिबान्यांच्या कब्जामुळे तेथील महिला सर्वात जास्त चिंतेत आहेत. अफगाणिस्तान महिला फुटबॉल संघाच्या माजी कर्णधारानं खेळाडूंना आपला जीव वाचवण्यासाठी केलं मोठं आवाहन

अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या कब्जामुळे तेथील महिला सर्वात जास्त चिंतेत आहेत आणि त्यांच्यात भीतीचं वातावरणही पसरलेलं आहे. १९९६ ते २००१  यादरम्यान तालिबान राजवटीच्या क्रूरतेचा सामना करणाऱ्या अफगाण महिलांना पुढील दिवस त्यांच्यासाठी तितकेच भयानक ठरू शकतील अशी भीतीही वाटत आहे. याच भीतीतून अफगाणिस्तान महिला फुटबॉल संघाच्या माजी कर्णधारानं खेळाडूंना आपला जीव वाचवण्यासाठी सोशल मीडियावरून स्वत:चे फोटो हटवण्यास आणि त्यांचे किट्स जाळण्यास सांगितलं आहे.

कोपहेगनमध्ये असलेल्या खालिदा पोपल हीनं बुधवारी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. "दहशतवाद्यांनी त्यांच्या यापूर्वीच्या राजवटीत महिलांची हत्या केली, बलात्कार केले आणि महिलांवर दगडफेकही केली, यासाठीच महिला फुटबॉलर्स आपल्या भविष्याबाबत चिंतीत आहेत," असं तिनं मुलाखतीदरम्यान सांगितलं. दरम्यान, यावर अफगाणिस्तान महिला फुटबॉल लीगच्या सह-संस्थापकानंही प्रतिक्रिया दिली. "तिनं कायमच तरुणींना खंबीरपणे उभं राहण्यासाठी आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रेरित केलं आहे, परंतु तिचा हा संदेश निराळा आहे," असं त्यांनी नमूद केलं. 

"आज मी त्यांना त्यांचे नाव बदलण्यास, त्यांची ओळख पुसून टाकण्यास आणि त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी फोटो हटवण्यास सांगत आहे. मी त्यांना राष्ट्रीय संघाची जर्सी हटवण्यास किंवा जाळण्यास सांगत आहे. मी एक कार्यकर्ती म्हणून काम केलं आणि राष्ट्रीय संघात मान्यता मिळवण्यासाठी शक्य ते सर्व केले, माझ्यासाठी हे सर्व खूप वेदनादायक आहे. देशासाठी खेळण्याचा आम्हाला किती अभिमान होता," असंही खालिदानं सांगितलं.

महिला खेळाडूंमध्ये भीती"महिला खेळाडूंमध्ये खूप भीती आणि चिंतेचं वातावरण आहे. असं कोणी नाही ज्यांच्याकडून संरक्षण किंवा मदत मागितली जाऊ शकते. त्यांना भीती वाटते की कधीही कोणीतरी दार ठोठावू शकते. आम्ही देश कोसळताना पाहत आहोत. सर्व अभिमान, आनंद, महिला सक्षमीकरण... हे सर्व व्यर्थ गेलं," अशी खंतही तिनं यावेळी व्यक्त केली.

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानFootballफुटबॉलWomenमहिला