बोको हराम काळ्या यादीत

By Admin | Updated: May 24, 2014 04:32 IST2014-05-24T04:32:59+5:302014-05-24T04:32:59+5:30

संयुक्त राष्ट्राने नायजेरियातील बोको हराम संघटना काळ्या यादीत टाकली असून, अल काईदाशी संलग्नित दहशतवादी संघटना असल्याचे जाहीर केले आहे

Boko Haram is in the black list | बोको हराम काळ्या यादीत

बोको हराम काळ्या यादीत

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्राने नायजेरियातील बोको हराम संघटना काळ्या यादीत टाकली असून, अल काईदाशी संलग्नित दहशतवादी संघटना असल्याचे जाहीर केले आहे. नायजेरियात या संघटनेने अपहरण केलेल्या २०० बेपत्ता मुलींना शोधण्याच्या प्रयत्नांनी पुन्हा वेग घेतला आहे. बोको हराम संघटना दहशतवादी असल्याचे जाहीर झाल्यानंतर अमेरिकेने या घोषणेचे स्वागत केले असून, बोको हरामच्या मालमत्ता गोठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संघटनेच्या कारवाया मुख्यत्वे उत्तर नायजेरियात चालू असून, हा भाग इस्लामी राज्य म्हणून जाहीर करावा अशी त्यांची मागणी आहे. २००९ पासून त्यांनी केलेल्या हिंसाचारात हजारो लोक मरण पावले आहेत. बोको हराम आता अल काईदाशी संलग्नित संघटना म्हणून जाहीर झाली. (वृत्तसंस्था) असून, संयुक्त राष्टÑाचे निर्बंध या संघटनेवर लागू आहेत. या संघटनेला आर्थिक मदत वा साहित्य पोहोचवल्यास ती व्यक्ती वा संघटना काळ्या यादीत टाकली जाईल, असे आॅस्ट्रेलियाचे राजदूत गॅरी क्विानॉन यांनी सांगितले. ते संयुक्त राष्टÑाच्या अल काईदा निर्बंध समितीचे अध्यक्ष आहेत. बोको हराम संघटनेने कट्टरवादाला समर्थन दिले असून मालीत अल काईदाच्या बरोबरीने संघर्ष केल्याचे पुरावे आहेत, असे क्वीनॉन यांनी पत्रकारांना सांगितले. मुलींच्या सुटकेची मागणी नायजेरियात अबुजा येथे २०० लोकांनी एक मोर्चा काढून, अध्यक्ष गुडलक जोनाथन यांना मुलींची सुटका करण्याचे प्रयत्न वाढवावेत अशी मागणी केली. १४ एप्रिल रोजी झालेल्या या अपहरणाचा जगात सर्वत्र निषेध होत आहे. आंदोलकांना अध्यक्षांना भेटण्यास पोलिसांनी बंदी घातली; पण सरकारच्या एका समितीने त्यांची भेट घेतली.

Web Title: Boko Haram is in the black list