२० मिनिटांच्या योगाने मेंदूला चालना

By Admin | Updated: June 22, 2015 00:34 IST2015-06-22T00:34:18+5:302015-06-22T00:34:18+5:30

२० मिनिटे सतत योगासने केल्यास मेंदूला चालना मिळते व मेंदूचे कार्य अधिक सुधारते, असा एका भारतीय संशोधकाच्या नेतृत्वाखाली केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष आहे.

Boil the brain with a 20-minute yoga | २० मिनिटांच्या योगाने मेंदूला चालना

२० मिनिटांच्या योगाने मेंदूला चालना

वॉशिंग्टन : २० मिनिटे सतत योगासने केल्यास मेंदूला चालना मिळते व मेंदूचे कार्य अधिक सुधारते, असा एका भारतीय संशोधकाच्या नेतृत्वाखाली केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष आहे.
हटयोगावरील एका सेशनमध्ये हा अभ्यास करण्यात आला असून, योगासने केल्यानंतर कामात अधिक अचूकता येते व स्मरणशक्तीतही फरक पडतो, असे लक्षात आले आहे. काम करताना त्यावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते तसेच नवी माहिती लक्षात ठेवण्याचीही क्षमता योगाने वाढते, असे या संशोधनाच्या निष्कर्षात म्हटले आहे. इलिनॉईस विद्यापीठात पदवीचा अभ्यास करणारी भारतीय विद्यार्थिनी नेहा गोठे हिने हा अभ्यास केला आहे.


 

 

Web Title: Boil the brain with a 20-minute yoga