शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

४५० प्रवाशांसह बोट बुडाली

By admin | Updated: June 3, 2015 01:25 IST

चीनमधील यांगत्से नदीत वादळामुळे ४५८ प्रवाशांसह जहाज बुडाले असून, यात बहुतांश वयोवृद्ध लोक होते. चीनच्या हुबेई प्रांतात सोमवारी रात्री हा अपघात झाल्यानंतर

बीजिंग : चीनमधील यांगत्से नदीत वादळामुळे ४५८ प्रवाशांसह जहाज बुडाले असून, यात बहुतांश वयोवृद्ध लोक होते. चीनच्या हुबेई प्रांतात सोमवारी रात्री हा अपघात झाल्यानंतर मदत कार्यकर्ते दिवसभर बेपत्ता लोकांचा शोध घेत होते. किमान ५ जण या अपघातात मरण पावले असून शेकडो बेपत्ता आहेत. चीनमधील सर्वात वाईट नौका अपघातांपैकी हा अपघात आहे. ईस्टर्न स्टार शिप असे अपघातग्रस्त जहाजाचे नाव असून, ते चार मजली होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी १.१५ वाजता हे जहाज नानजिंग येथून निघाले, ते चोंगकिंग येथे नदीच्या वरच्या बाजूला पोहोचणार होते. जियान्ली येथे रात्री वादळी हवेत सापडून हे जहाज एक वा दोन मिनिटात बुडाले. जहाजाचा कॅप्टन या दुर्दैवी अपघातातून वाचला असून, त्याने ही माहिती दिली. जहाजाचा कॅप्टन व मुख्य अभियंता यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत १४ जणांची सुखरूप सुटका झाली असून, पाच मृतदेह हाती लागले आहेत. ४३९ जण बेपत्ता आहेत. चीनची ही नदी ६३०० कि.मी. लांब आहे. अखेरचा प्रयत्न म्हणून आॅक्सिजन सोडणारअखेरचा प्रयत्न म्हणून चिनी सरकारने बुडालेल्या जहाजात आॅक्सिजन सोडावा असे आदेश दिले आहेत. जहाजात अडकलेले जिवंत लोक सुखरूप बाहेर काढता येतील अशी आशा यामुळे निर्माण झाली आहे. सरकारी टीव्ही वाहिनीवर जहाजाचे उलटलेले धूड दाखविण्यात आले. मदत कार्यकर्ते जहाजावर पाणी नसलेल्या भागात उभे राहून आतून ठोकलेला आवाज ऐकू येतो काय हे पाहत आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्टेट कौन्सिलच्या सदस्यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पंतप्रधान ली केकियांग घटनास्थळी रवाना झाले आहेत. (वृत्तसंस्था)