अंध, ‘सेरेब्रल’ग्रस्तांनाही लेखनिक

By Admin | Updated: June 22, 2015 00:03 IST2015-06-22T00:03:28+5:302015-06-22T00:03:28+5:30

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व (प्रीलिम) आणि मुख्य परीक्षेत अंध, अपंग सेरेब्रल पाल्सीग्रस्त उमेदवारांना लेखनिकाची मदत घेता येऊ शकेल.

The blind, 'cerebral' victims are also authors | अंध, ‘सेरेब्रल’ग्रस्तांनाही लेखनिक

अंध, ‘सेरेब्रल’ग्रस्तांनाही लेखनिक

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व (प्रीलिम) आणि मुख्य परीक्षेत अंध, अपंग सेरेब्रल पाल्सीग्रस्त उमेदवारांना लेखनिकाची मदत घेता येऊ शकेल. केंद्रीय लोकसेवा संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) रविवारी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
अशा प्रकारच्या उमेदवारांना प्रति तासाला २० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. उमेदवारांना आपल्या हाताने प्रश्नपत्रिकेची उत्तरे लिहावी लागतील; परंतु कोणत्याही परिस्थितीत त्यांना उत्तर लिहिण्यासाठी लेखनिकाची मदत घेण्याची मुभा दिली जाऊ शकते. तथापि अंध, लोकोमोटर अपंगत्व असलेले आणि सेरेब्रल पाल्सीग्रस्त उमेदवारांचे लेखनकार्य जर त्याच्या अपंगत्वामुळे (किमान ४० टक्के दुर्बलता) प्रभावित होत असेल, तर त्याला नागरी सेवेच्या प्रारंभिक आणि मुख्य परीक्षेत लेखनिकाची मदत घेण्याची अनुमती दिली जाईल, असेही म्हटले आहे.
सेरेब्रल पाल्सी हा मेंदूशी संबंधित आजार आहे, ज्यामुळे शरीराची हालचाल प्रभावित होत असते, तर लोकोमोटिव्ह दुर्बलता ही सांधे व स्नायूंमधील अकार्यक्षमता दर्शविते. भारतीय वनसेना परीक्षेत सामील होणाऱ्या उमेदवारांना मात्र प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी ६० मिनिटे अतिरिक्त दिली जातील. (लोकमत न्यूज नेटवर्क)





 

 

Web Title: The blind, 'cerebral' victims are also authors