शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
3
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
4
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
5
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
6
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
7
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
9
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
10
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
11
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
12
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
13
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
14
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
15
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
16
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
17
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
18
मोठी घडामोड! होर्मुज मार्ग खुला करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
19
टिंडरवर मैत्री, भेटायला बोलावलं; जेवताना ती म्हणाली बाथरूममध्ये जा, बाहेर येताच तरुणाचा खेळ खल्लास!
20
हे भगवान! ५०१ रुपयांचं 'यंत्र' विकत घेतलं, १० वर्षं देवघरात पूजा केली; Reel पाहून उघडलं तेव्हा धक्काच बसला!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी घडामोड! होर्मुज मार्ग खुला करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 10:48 IST

Strait of Hormuz Security Update: होर्मुज सामुद्रधुनीच्या सुरक्षेबाबत UN मध्ये शनिवारी मतदान होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पायाभूत सुविधा नष्ट करण्याचा इशारा दिला असून UN प्रमुखांनी शांततेचे आवाहन केले आहे.

मध्य-पूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून जागतिक तेल पुरवठ्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या 'होर्मुजच्या सामुद्रधुनी' बाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत होणारे मतदान आता शनिवारी होणार आहे. बहरीनने मांडलेल्या या प्रस्तावावर शुक्रवारी मतदान होणे अपेक्षित होते, परंतु चीनच्या विरोधामुळे हा निर्णय लांबणीवर पडला आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट पावर प्लांट आणि पूल उडवण्याची धमकी देऊन युद्धाचा भडका उडवला आहे.

UN मध्ये का रखडले मतदान?बहरीनने मांडलेल्या या प्रस्तावाचा मुख्य उद्देश होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारी व्यापारी जहाजांची वाहतूक सुरक्षित करणे हा आहे. या प्रस्तावानुसार, देशांना आपल्या जहाजांच्या रक्षणासाठी आवश्यक ते 'संरक्षणत्मक उपाय' करण्याची मुभा मिळणार आहे. मात्र, चीनने यातील 'बळाचा वापर' करण्याच्या तरतुदीला विरोध दर्शवला आहे. चीनच्या मते, यामुळे या क्षेत्रात लष्करी हस्तक्षेप वाढून परिस्थिती अधिक बिघडू शकते. यामुळे शनिवारी हा प्रस्ताव पारित होण्याची शक्यता मावळली आहे. 

ट्रम्प यांचा 'पॉवर'फुल इशारा!अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा खळबळजनक इशारा दिला आहे. "आमच्या सैन्याने अद्याप इराणमध्ये पूर्ण ताकदीने कारवाई सुरू केलेली नाही. येणाऱ्या काळात इराणचे महत्त्वाचे पूल आणि वीज प्रकल्प आमचे पुढचे लक्ष्य असू शकतात," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे आखाती देशांमध्ये युद्धाची भीषणता वाढण्याची चिन्हे आहेत.

अँटोनियो गुटेरेस यांची शांततेसाठी सादवाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही बाजूंना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. "उध्वस्त करून नव्हे, तर संवादानेच प्रश्न सुटतील," असे सांगत त्यांनी आपला विशेष दूत जीन अर्नाल्ट यांना शांती चर्चेसाठी नियुक्त केले आहे. त्यांनी अमेरिका, इस्रायल आणि इराण या तिन्ही देशांना संयम राखण्याची विनंती केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : China blocks Hormuz proposal; UN vote delayed amid rising tensions.

Web Summary : China opposed a UN proposal to secure Hormuz Strait, delaying the vote. Trump threatened Iran, escalating tensions. The UN urges dialogue amid rising fears of conflict in the Gulf.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्धchinaचीनunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ