मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 08:04 AM2024-05-23T08:04:27+5:302024-05-23T08:04:57+5:30

१००० शहरांच्या जागतिक यादीत राष्ट्रीय राजधानी ३५०व्या क्रमांकावर, मुंबई ४२७व्या, तर पुणे ५३४व्या स्थानी आहे. तसेच, पर्यावरणाबाबत दिल्ली ९७३ व्या क्रमांकावर असून, उत्तर प्रदेशातील सुलतानपूर वगळता सर्व भारतीय शहरांमध्ये दिल्लीची अवस्था सर्वांत वाईट आहे.

Better living conditions in Delhi than Mumbai; Indian cities retreat in Oxford Economics index | मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली

मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली

लंडन : अर्थव्यवस्था, मनुष्यबळ, राहणीमान, पर्यावरण आणि प्रशासन व्यवस्थेबाबत ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने मंगळवारी जाहीर केलेल्या १००० जागतिक शहरांच्या क्रमवारीत भारतीय शहरांमध्ये दिल्लीने पहिला क्रमांक मिळविला आहे. अनेक बाबींमध्ये दिल्लीनेमुंबईला मागे टाकले असले, तरी पर्यावरणाबाबत दिल्लीची स्थिती मात्र वाईट असल्याचे अहवालात म्हटले आहे.

१००० शहरांच्या जागतिक यादीत राष्ट्रीय राजधानी ३५०व्या क्रमांकावर, मुंबई ४२७व्या, तर पुणे ५३४व्या स्थानी आहे. तसेच, पर्यावरणाबाबत दिल्ली ९७३ व्या क्रमांकावर असून, उत्तर प्रदेशातील सुलतानपूर वगळता सर्व भारतीय शहरांमध्ये दिल्लीची अवस्था सर्वांत वाईट आहे.

भारतातील टॉप १० शहरे
शहर     (जा.क्र)     अर्थव्यवस्था    मनुष्यबळ    राहणीमान    पर्यावरण    प्रशासन
दिल्ली     (३५०)     १०८     ५१     ८३८     ९७३     ३८० 
बंगळुरू    (४११)     १७१     १७९     ८४७     ७२७     ३८० 
मुंबई    (४२७)     १६९     १२६     ९१५     ८१२     ३८० 
चेन्नई     (४७२)     २४४     १८९     ८७९     ७६३     ३८० 
कोची     (५२१)     २५९     ५६०     ७६५     ७९०     ३८० 
कोलकाता     (५२८)    १६६     ३९२     ८८४     ९१९     ३८० 
पुणे     (५३४)     ३८६     १८१     ८९७     ७१३     ३८० 
त्रिशूर     (५५०)     ३२६     ६९८     ७५७     ५८१     ३८० 
हैदराबाद     (५६४)     २५२     ५२४     ८८२     ६७४     ३८० 
कोझीकोडे     (५८०)    ३९२     ६०७     ७८३     ६२०     ३८० 

 उत्तर प्रदेशातील सुलतानपूर शहर सर्वांत खालच्या म्हणजे १००० व्या स्थानावर आहे. जागतिक शहरे निर्देशांकात १६३ वेगवेगळ्या देशांमध्ये असलेल्या जगातील १००० प्रमुख शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोणती शहरे? 
नागपूर (७४४), वसई-विरार (७४८), अमरावती (८१५), नाशिक (८२६), छत्रपती संभाजीनगर (८४२), सोलापूर (८४८), कोल्हापूर (८७७), सांगली (९४३)
 

Web Title: Better living conditions in Delhi than Mumbai; Indian cities retreat in Oxford Economics index

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.