बगदाद हल्ला; मृतांची संख्या ७३

By Admin | Updated: March 1, 2016 03:09 IST2016-03-01T03:09:54+5:302016-03-01T03:09:54+5:30

इराकमध्ये बगदाद शहरात इसिसने केलेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या ७३ वर पोहोचली आहे. इसिसने बाजारपेठेवर बॉम्बहल्ले केले होते.

Baghdad attacks; Number of dead 73 | बगदाद हल्ला; मृतांची संख्या ७३

बगदाद हल्ला; मृतांची संख्या ७३

बगदाद : इराकमध्ये बगदाद शहरात इसिसने केलेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या ७३ वर पोहोचली आहे. इसिसने बाजारपेठेवर बॉम्बहल्ले केले होते.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गंभीर जखमी झालेल्या अनेक नागरिकांचा मृत्यू झाला, तर ११२ जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सद्र शहराच्या गजबजलेल्या भागात रविवारी हे हल्ले झाले होते. या हल्ल्यानंतर पाच जण बेपत्ता आहेत. एका आत्मघातकी हल्ल्यानंतर नागरिक मदतीसाठी एकत्र जमले तेव्हा तात्काळ दुसरा बॉम्बस्फोट झाला. उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मृतांच्या आकडेवारीला दुजोरा दिला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Baghdad attacks; Number of dead 73