CoronaVirus : जगभरात 1 लाख 70 हजार जणांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियात 7 लाख 80 हजार नोकऱ्या संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 03:26 PM2020-04-21T15:26:54+5:302020-04-21T15:39:03+5:30

ऑस्ट्रेलियन सांख्यिकी विभाग (एबीएस) आणि ऑस्ट्रेलियन कर आकारणी कार्यालयाने जारी केलेल्या एका डेटानुसार, 14 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान दोशातील नोकऱ्यांमध्ये 6 टक्क्यांनी घट झाली. सर्वाधिक नुकसान 20 वर्षां खालील तरुणांचे झाले आहे.

Australia loses more than 7 lac jobs due to coronavirus crisis sna | CoronaVirus : जगभरात 1 लाख 70 हजार जणांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियात 7 लाख 80 हजार नोकऱ्या संपुष्टात

CoronaVirus : जगभरात 1 लाख 70 हजार जणांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियात 7 लाख 80 हजार नोकऱ्या संपुष्टात

Next
ठळक मुद्देऑस्ट्रेलियात 14 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान नोकऱ्यांमध्ये 6 टक्क्यांनी घट 20 वर्षां खालील तरुणांचे सर्वाधिक नुकसानजगातील अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंड हे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेले देश


वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. मोठ-मोठे देशदेखील कोरोनापुढे हतबल झाले आहेत. आतापर्यंत या व्हायरसने जगभरात लोखो लोकांचा बळी घेतला आहे. तर लाखो लोकांना याची लागण झाली आहे. एवढेच नाही, तर, या व्हायरसच्या धाकाने जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. यामुळे तेथील उद्योग-धंदे ठप्प झाले. परिणामी विविध क्षेत्रांतील कामगारांना याचा फटका बसताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियात तर शटडाऊन झाल्याने आणि उद्योग बंद केल्याने जवळजवळ 7 लाख 80 हजार नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत.

ऑस्ट्रेलियन सांख्यिकी विभाग (एबीएस) आणि ऑस्ट्रेलियन कर आकारणी कार्यालयाने जारी केलेल्या एका डेटानुसार, 14 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान दोशातील नोकऱ्यांमध्ये 6 टक्क्यांनी घट झाली. सर्वाधिक नुकसान 20 वर्षां खालील तरुणांचे झाले आहे. या वयोगटात जवळपास 9.9 टक्क्यांची घट झाली आहे. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया आणि तस्मानिया या राज्यांत नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक घट झाली आहे. 

कोरोनाने जगभरात आतापर्यंत एक लाख 70 हजार 400 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. तर जवळपास 24 लाख 81 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिलासादायक गोष्ट एवढीच, की यापैकी सहा लाख 46 हजार 675 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

अमेरिकेत 24 तासांत 1,939 जणांचा मृत्यू -

नुकतेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही परदेशी व्यक्तीला अमेरिकेत स्थायिक होण्यास बंदी घातली जाणार आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. 'न दिसणाऱ्या शत्रूच्या हल्ल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती पाहता आमच्या अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या वाचवणे गरजेचे आहे. त्यासाठी एका आदेशावर मी स्वाक्षरी करणार आहे. ज्यात बाहेरून अमेरिकेत येणाऱ्या नागरिकांना स्थायिक होण्यास बंदी घातली जाणार आहे. अमेरिकेतील सर्वाधिक कोरोना प्रभावित शहर न्यू यॉर्क आहे. येथे आतापर्यंत 18 हजार 929 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंड हे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेले देश आहेत. 

Web Title: Australia loses more than 7 lac jobs due to coronavirus crisis sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.