अमेरिका-इंग्लंडच्या मदतीनं ऑस्ट्रेलिया तयार करतोय  आण्विक पाणबुड्या, चीनला फुटला घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 01:29 PM2021-09-16T13:29:02+5:302021-09-16T13:31:49+5:30

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिकेच्या या प्रकल्पावर टीका करणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, या करारानंतर काही देश अणुप्रसार प्रतिबंध कराराच्या (एनपीटी) पळवाटांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात.

Australia America and Britain joins hand for nuclear submarine project which made china furious | अमेरिका-इंग्लंडच्या मदतीनं ऑस्ट्रेलिया तयार करतोय  आण्विक पाणबुड्या, चीनला फुटला घाम

अमेरिका-इंग्लंडच्या मदतीनं ऑस्ट्रेलिया तयार करतोय  आण्विक पाणबुड्या, चीनला फुटला घाम

Next

चीनचा सामना करण्यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने एक सुरक्ष भागीदारी केली आहे. या योजअंतर्गत तीन देश संयुक्तपणे ऑस्ट्रेलियामध्ये अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या तयार करणार आहेत. या भागीदारीनंतर चीन अत्यंत भडकला आहे. काही देशांनी 'शीतयुद्धाची मानसिकता' ठेऊन काम करणे बंद करावे, असे चीनच्या वॉशिंग्टन दूतावासाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. (Australia America and Britain joins hand for nuclear submarine project which made china furious)

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संयुक्तपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यांसंदर्भात घोषणा केली आहे. या प्रोजेक्टला Aukus असे नाव देण्यात आले आहे. मॉरिसन म्हणाले, तीन देशांचे संघ येत्या दीड वर्षात एक संयुक्त योजना तयार करतील. या योजनेअंतर्गत ऑस्ट्रेलियाची अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी असेंबल केले जाईल. अणुभट्टीवर चालणाऱ्या पाणबुड्या असणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील सातवा देश असेल.

पाकिस्तानला डबलगेमची किंमत चुकवावी लागणार; अमेरिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिकेच्या या प्रकल्पावर टीका करणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, या करारानंतर काही देश अणुप्रसार प्रतिबंध कराराच्या (एनपीटी) पळवाटांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. खरे तर, NPT अण्वस्त्रे नसलेल्या देशांना आण्विक-शस्त्रास्त्रांवर चालणाऱ्या पाणबुड्या बांधण्याची परवानगी देते. मात्र, यामुळे कोणत्याही देशाची अण्वस्त्रे बनविण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते.

एनपीटीचेच पालन करणार -ऑस्ट्रेलिया -
एनपीटीच्या या पळवाटाचा फायदा घेत ऑस्ट्रेलिया अण्वस्त्रे बनवू शकतो आणि आपली लष्करी क्षमता वाढवू शकतो. मात्र, अण्वस्त्रांची संख्या वाढविण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही, आम्ही आण्विक अप्रसार कराराचेच (एनपीटी) पालन करू, असे ऑस्ट्रेलियन प्रशासनाने वारंवार म्हटले आहे. मात्र, काही अहवालांनुसार, अमेरिका आणि इंग्लंडच्या साथीने ऑस्ट्रेलियन सरकारने उचललेले हे पाऊल अण्वस्त्रांच्या प्रसाराला प्रोत्साहन देण्याचे काम करू शकते.

Web Title: Australia America and Britain joins hand for nuclear submarine project which made china furious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app