जगभर: शिक्षकाने केलं भारतासह ९ देशातील ८९ मुलींचे शोषण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 14:13 IST2026-02-23T14:11:36+5:302026-02-23T14:13:18+5:30

शिक्षकाचं काम मुलांना शिकवण्याचं, त्यांच्यावर सुसंस्कार करण्याचं, त्यांना घडवण्याचं आणि भविष्यात त्यांनी 'माणूस' म्हणून पुढे यावं यासाठी प्रयत्न करण्याचं. पण या शिक्षकानं काय करावं? १९६७ ते २०२२ या कालावधीत त्यानं तब्बल नऊ देशांतील बालिकांवर लैंगिक अत्याचार केले.

Around the world: Teacher exploited 89 girls from 9 countries including India! | जगभर: शिक्षकाने केलं भारतासह ९ देशातील ८९ मुलींचे शोषण!

जगभर: शिक्षकाने केलं भारतासह ९ देशातील ८९ मुलींचे शोषण!

गोष्ट आहे फ्रान्समधली. ही गोष्ट सुरू होते १९६०च्या दशकात. ती अजूनही संपलेली नाही. या गोष्टीला हिरो नाही, आहे फक्त व्हिलन. हा व्हिलन आहे पूर्वीचा शिक्षक. त्याचं नाव जॅक्स लेवुग्ले. वय ७९ वर्षे! शिक्षकाचं काम मुलांना शिकवण्याचं, त्यांच्यावर सुसंस्कार करण्याचं, त्यांना घडवण्याचं आणि भविष्यात त्यांनी 'माणूस' म्हणून पुढे यावं यासाठी प्रयत्न करण्याचं. पण या शिक्षकानं काय करावं? १९६७ ते २०२२ या कालावधीत त्यानं तब्बल नऊ देशांतील बालिकांवर लैंगिक अत्याचार केले. त्यात जर्मनी, स्वीत्झर्लंड, मोरक्को, नायजर, अल्जिरिया, फिलीपिन्स, कोलंबिया, फ्रान्स आणि भारतीय अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. अत्याचारपीडित मुलींची संख्या आहे तब्बल ८९!

अर्थात ही संख्या आहे फक्त उघड झालेल्या प्रकरणांची. अजून बऱ्याच मुलींवर त्यानं अत्याचार केले असावेत, असा अधिकाऱ्यांचा कयास आहे. पण ते कळावं कसं? त्यासाठी हा खटला नुकताच सार्वजनिक करण्यात आला आहे. फ्रान्सच्या ग्रेनोबल शहरातील सरकारी वकील एटिएन मंटो यांनी यासंदर्भात पीडितांनी पुढे यावं आणि आपल्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती द्यावी, असं आवाहन केलं आहे.

पूर्वी ज्या मुलींवर त्यानं अत्याचार केले असतील, पण बदनामीच्या भीतीपोटी ज्यांनी तक्रारी केल्या नसतील आता त्या मुलीही सज्ञान आणि मोठ्या झालेल्या असतील, पण हा 'तोच' आरोपी आहे, ज्यानं आपल्यावर अत्याचार केले होते, हे ओळखू यावं यासाठी एक अभिनव मार्ग अवलंबिण्यात आला आहे.

आरोपी जॅक्स लेग्ले याचे १९६५ पासून २००० पर्यंतचे अनेक फोटो जाहीर करण्यात आले आहेत, जेणेकरून पीडित त्याला ओळखू शकतील आणि पुढे येऊ शकतील!

जॅक्स लेवुग्ले फ्रेंच भाषेचा शिक्षक आणि गुहांचा अभ्यास (स्पेलिऑलॉजी) यासंदर्भात प्रशिक्षक म्हणून काम करत होता. विविध ठिकाणी जाऊन तो तरुणवर्गाशी संपर्क साधत असे आणि नंतर त्यांच्यासोबत लैंगिक गैरवर्तन करत असे.

ज्या-ज्या पीडितांवर त्यानं अत्याचार केले, त्यातील बहुतांश मुलींचं वय १३ ते १७ वर्षादरम्यान होतं. जॅक्सवरील आरोप निश्चित झाल्यानंतर २०२४ पासून तो कोठडीत आहे. पण या आरोपीच्या गुन्ह्यांचा पाढा इथेच थांबत नाही. त्याची चौकशी केल्यानंतर आपली आजारी आई आणि वृद्ध मावशी यांचीही त्यानं हत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यानं त्याची कबुलीही दिली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या नातेवाइकांनाच त्याच्या गुन्हेगारी कृत्यावर संशय आल्यानं त्याचे हे भयानक कारनामे उघडकीस आले.

जॅक्सच्या पुतण्यालाच त्याच्या कृत्यांचा संशय आला. त्यामुळे त्याने एके दिवशी गुपचूप जॅक्सच्या खोलीची झडती घेतली. तेथे त्याला एक यूएसबी ड्राईव्ह सापडला. त्यात त्यानं अल्पवयीन मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचाराची छायाचित्रे होती. 

या ड्राइव्हमध्ये १५ भागांमध्ये सविस्तर माहिती लिहिलेली होती. त्यात त्यानं स्वतःच या लैंगिक अत्याचारांची नोंद केलेली होती. तपास अधिकाऱ्यांनी हे दस्तऐवज वाचून ८९ पीडितांची ओळख पटवली. १९७० च्या दशकात त्यानं कर्करोगाने पीडित असलेल्या आपल्या आईला आणि १९९० च्या दशकात आपल्या ९२ वर्षांच्या मावशीची उशीने तोंड दाबून हत्या केली होती.

Web Title : शिक्षक ने भारत समेत 9 देशों में 89 लड़कियों का शोषण किया!

Web Summary : फ्रांसीसी शिक्षक जैक्स लेवुगले (79) ने 1967-2022 तक भारत समेत नौ देशों में 89 लड़कियों का यौन शोषण किया। उस पर अपनी मां और मौसी की हत्या का भी आरोप है। अधिकारियों ने पीड़ितों से आगे आने का आग्रह किया है; पहचान में मदद के लिए तस्वीरें जारी की गई हैं।

Web Title : Teacher Exploited 89 Girls in 9 Countries Including India

Web Summary : French teacher Jacques Levugle, 79, abused 89 girls across nine countries, including India, from 1967-2022. He is also accused of murdering his mother and aunt. Authorities urge victims to come forward; photos have been released to aid identification.