शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१० लाख दाम्पत्यांचे दुस-या मुलासाठी अर्ज

By admin | Updated: January 13, 2015 00:19 IST

चीनमध्ये गेल्या दहा वर्षांपासून असणारे एक कुटुंब एक मूल धोरण शिथिल झाल्यानंतर, चिनी नागरिकांच्या आशा पालवल्या असून दहा लाख लोकांनी दुसरे मूल होण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज केला

बीजिंग : चीनमध्ये गेल्या दहा वर्षांपासून असणारे एक कुटुंब एक मूल धोरण शिथिल झाल्यानंतर, चिनी नागरिकांच्या आशा पालवल्या असून दहा लाख लोकांनी दुसरे मूल होण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज केला आहे, असे चीनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. चीन सरकारने २०१३ च्या अखेरच्या टप्प्यात एक मूल धोरण शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दहा लाख लोकांनी दुसरे मूल होण्याची परवानगी मागितली आहे. ती सरकारच्या अपेक्षेशी सुसंगत आहे, असे राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब नियोजन आयोगाच्या प्रवक्त्या माओ कुनान यांनी सांगितले. ही परवानगी दिल्यानंतर दरवर्षी जादा २० लाख मुले जन्माला येतील असे माओ म्हणाले. एक मूल धोरण शिथिल झाल्यानंतर या वर्षापासून अतिरक्त मुले जन्माला येतील. चीनची महाकाय लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी १९७९ साली चीनमध्ये एक मूल धोरण लागू करण्यात आले होते. त्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली; पण त्यामुळे सामाजिक रचनेत फरक पडण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दशकात समाजातील तरुण व वृद्धांची टक्केवारी बदलू लागली. त्यामुळे हे धोरण शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे समाजात काय बदल होतील याचा अभ्यास आरोग्य अधिकारी करत आहेत. गर्भवती महिला व लहान मुले यांना आरोग्य सुविधा कशा देता येतील यावरही विचार चालू आहे. चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्टँडिंग कमिटीने एक मूल धोरण शिथिल करण्यास संमती दिली आहे. त्यानंतर ज्या दाम्पत्यांना दुसरे मूल हवे आहे त्यांना अर्ज करण्याची परवानगी आहे. पती व पत्नी या दोघांपैकी एकजण त्यांच्या पालकांचे एकच मूल असेल तरच ही परवानगी दिली जाईल असे धोरण आहे. चीनमध्ये एक मूल असणारी १५० दशलक्ष दाम्पत्ये असून, त्यापैकी ७० टक्के लोकांना दुसरे मूल होण्याची परवानगी दिल्यास देशात ९० दशलक्ष जास्त मुले जन्माला येतील. सध्या चीनमधील दाम्पत्यावर असणारा सरकारच्या धोरणाचा पगडा कमी होत आहे. (वृत्तसंस्था)