ढाक्यात आणखी एका हिंदू पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला

By Admin | Updated: July 2, 2016 12:12 IST2016-07-02T12:12:53+5:302016-07-02T12:12:53+5:30

इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी एका हिंदू पुजाऱ्याची व बौद्ध नेत्याची हत्या केल्याला एक दिवस होत नाही तर, दहशतवाद्यांनी आणखी एका हिंदू पुजाऱ्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले

Another Hindu priest killed in a fire in Dhaka | ढाक्यात आणखी एका हिंदू पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला

ढाक्यात आणखी एका हिंदू पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला

>ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. 2 - इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी एका हिंदू पुजाऱ्याची व बौद्ध नेत्याची हत्या केल्याला एक दिवस होत नाही तर, दहशतवाद्यांनी आणखी एका हिंदू पुजाऱ्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. भाबासिंधू रॉय असे राधा गोविंद मंदीरातील या पुजाऱ्याचे नाव आहे. मंदीराच्या आवारातील पुजाऱ्याच्या घरात घुसून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.
सात ते आठ जणांनी पुजाऱ्याच्या घराचा दरवाजा पहाटेच्यावेळी ठोठावला. पुजाऱ्याने रात्रपाळीचा सुरक्षा रक्षक असेल असे समजून दरवाजा उघडला. या हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारांच्या सहाय्याने पुजाऱ्यावर हल्ला केला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत.
ढाक्यामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये झालेल्या इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी हल्ल्यानंतर थोड्याचवेळात ही घटनाही घडली आहे. 

Web Title: Another Hindu priest killed in a fire in Dhaka