शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

...आणि स्मार्टफोन झाला त्याची अर्धांगिनी!

By admin | Updated: July 2, 2016 16:58 IST

मोबाईल फोन आणि खास करून स्मार्ट फोन हे आता केवळ संपर्काचे साधन न राहता जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनाचे एक अविभाज्य भाग झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
लास वेगास (अमेरिका): मोबाईल फोन आणि खास करून स्मार्ट फोन हे आता केवळ संपर्काचे साधन न राहता जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनाचे एक अविभाज्य भाग झाले आहेत. जागेपणीच्या काळात सदैव हाहात असणारे हे टिचभर यंत्र जणू मानवी शरीराचा एक नवा अवयव ठरू पाहात आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीनेस स्मार्टफोनशी चक्क लग्न करून या प्रेमाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. नव्हे  स्मार्टफोनची अपरिहार्यता ओळखून त्याने त्याला‘अर्धांगिनी’चा दर्जा दिला आहे.
ज्याला ‘हटके’ म्हणावे अशा अनेक विचित्र गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेल्या लास व्हेगास या स्वप्ननगरीत हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. अर्थात नेवादा राज्यात मनुष्य आणि निर्जिव वस्तुच्या अशा विवाहास कायदेशीर मान्यता नाही. पण हा विवाह कायद्यासाठी नव्हे तर बदलत्या जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी केला गेला, हे उघड आहे.
 
 
‘लास व्हेगास रिव्ह्यू जर्नल’ या स्थानिक वृत्तपत्राने हे वृत्त देताना लिहिले की, हा विवाह सोहळा लास व्हेगासला साजेश्या थाटात पार पडला. नवरदेव अ‍ॅरॉन चेरव्हेनाक अगदी नटून थटून आला होता, पण समोर असलेली वधू स्मार्टफोन असल्याने तिने ‘वेडिंग गाऊन’ऐवजी संरक्षक वेष्टण परिधान केले होते.
लिटल लास व्हेगास चॅपेलमध्ये ख्रिश्चन धार्मिक रुढींनुसार या विवाहात एकनिष्ठतेच्या आणाभाकाही घेतल्या गेल्या. लग्न लावणाऱ्या चर्चमधील पुरोहिताने रिवाजाप्रमाणे विचारले, ‘ अ‍ॅरॉन, तू या स्मार्टफोनचा तुझी लग्नाची पत्नी म्हणून स्वीकार करायला तयार आहेस? तू स्मार्टफोनला प्रेमाचे, सुखासमाधानाचे आणि कधीही अंतर न देण्याचे अभिवचन द्यायला तयार आहेस?’ या सर्व प्रश्नांना अ‍ॅरॉन यानेही मनापासून ‘हो’ असे उत्तर दिले. अर्थात धर्मरिवाजानुसार असे अभिवचन पत्नीकडून घेणे शक्य नव्हते व ते घेतलेही गेले नाही. त्यामुळे या विवाहात तेवढाच उणेपणा राहून गेला.
स्मार्टफोनशी विवाह करणारा अ‍ॅरॉन कलावंत व कला दिग्दर्शक आहे. विवाहानंतर तो नववधूसह मधुचंद्रासाठी कुठे गेला हे मात्र समजू शकले नाही!
सुरुवातीस असे लग्न लावण्यासाठी चॅपेलची जागा द्यायची की नाही, याबाबत माझी द्विधा मन:स्थिती होती. पण नंतर विचार केला की, या विवाहाने समाजात वेगळा संदेश जाणार असेल तर काय हरकत आहे आणि केवळ विवाहाला परवानगीच न देता मीही त्यात मनापासून सहभागी झालो असे मायकेल केली, लास व्हेगास चॅपेलचे मालक यांनी सांगितले.