अमेरिकेने परत केल्या भारताच्या दुर्मीळ वस्तू; कोहिनूर हिरा भारताला परत करा, ममदानींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 08:58 IST2026-05-01T08:58:31+5:302026-05-01T08:58:49+5:30

जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटनने भारताला परत करावा अशी विनंती ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांना मी करणार असल्याचे न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी सांगितले.

America returns rare items to India; Return Kohinoor diamond to India, Mamdani demands | अमेरिकेने परत केल्या भारताच्या दुर्मीळ वस्तू; कोहिनूर हिरा भारताला परत करा, ममदानींची मागणी

अमेरिकेने परत केल्या भारताच्या दुर्मीळ वस्तू; कोहिनूर हिरा भारताला परत करा, ममदानींची मागणी

न्यूयॉर्क - अमेरिकेने भारताला अंदाजे १४ दशलक्ष डॉलर्स किमतीच्या ६५७ पुरातन वस्तू परत केल्या आहेत. चोरीला गेलेल्या या कलात्मक वस्तू भारताला परत करण्यासाठी बरेच काही करणे बाकी असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.

तस्करीच्या क्षेत्रातील कुप्रसिद्ध व्यापारी सुभाष कपूर आणि तस्कर नॅन्सी विनर यांच्यासह काही टोळ्यांकडून या वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.
न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या राजदूत राजलक्ष्मी कदम यांच्या उपस्थितीत एका समारंभात या वस्तू भारताकडे सुपूर्द करण्यात आल्या. आज ६००हून अधिक अशा पुरातन कलात्मक वस्तू परत करण्यात आल्या आहेत.

६५७ पुरातन वस्तू 
सिंहांनी सुशोभित सिंहासनावर दोन कमळांच्या आसनावर बसलेल्या अवलोकितेश्वराच्या कांस्यमूर्तीचा समावेश. याचे मूल्य अंदाजे २० लाख डॉलर.
मूर्तीवरील शिलालेखात मूर्तीचा कारागीर द्रोणादित्य म्हणजेच सध्याच्या छत्तीसगड मध्ये रायपूरजवळील सिपूरचा रहिवासी होता, असा उल्लेख आहे. 
लाल वाळूतून तयार केलेली भगवान गौतम बुद्धाची मूर्ती, दुर्मीळ पुस्तके, पुरातन कलाकृती आणि वस्तूंसह ६,२०० हून अधिक सांस्कृतिक वारशांचा यात समावेश.

कोहिनूर हिरा भारताला परत करा : ममदानी
जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटनने भारताला परत करावा अशी विनंती ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांना मी करणार असल्याचे न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी सांगितले. राजांची भेट घेण्याआधी त्यांनी हे वक्तव्य पत्रकार परिषदेत केले होते. ममदानी यांनी ९/११ स्मारकस्थळी बुधवारी किंग चार्ल्स यांची भेट घेतली. मात्र त्यांनी कोहिनूर हिऱ्याबद्दल त्यांना काही सांगितले का याची पुष्टी होऊ शकलेली नाही. १८४९ मध्ये हा १०५.६ कॅरेटचा हिरा ब्रिटनकडे गेला होता, जो सध्या लंडन टॉवरमध्ये जतन केला आहे.

Web Title : अमेरिका ने लौटाईं भारतीय कलाकृतियाँ; कोहिनूर हीरा लौटाने की मांग

Web Summary : अमेरिका ने 14 मिलियन डॉलर की 657 भारतीय कलाकृतियाँ लौटाईं। न्यूयॉर्क के मेयर ने किंग चार्ल्स III से 1849 में लिए गए कोहिनूर हीरे को लौटाने का अनुरोध किया।

Web Title : US Returns Indian Artifacts; Demand to Return Kohinoor Diamond

Web Summary : US returned 657 Indian artifacts worth $14 million. NYC mayor to request King Charles III to return the Kohinoor diamond, taken in 1849, during a meeting at 9/11 memorial.