न्यूयॉर्कमध्ये लिमोझिनचा विचित्र अपघात, 20 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 08:53 IST2018-10-08T08:47:10+5:302018-10-08T08:53:01+5:30

न्यूयॉर्कमध्ये लिमोझिनचा विचित्र अपघात झाला असून यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

america limousine kills 20 in horrific accident at popular tourist spot of schoharie in new york say officials | न्यूयॉर्कमध्ये लिमोझिनचा विचित्र अपघात, 20 जणांचा मृत्यू 

न्यूयॉर्कमध्ये लिमोझिनचा विचित्र अपघात, 20 जणांचा मृत्यू 

न्यूयॉर्क - अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये कारचा एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील स्कॉहारी या प्रसिद्ध पर्यटन स्थळी लिमोझिन कारचा भीषण अपघात झाला. 

शनिवारी (6 ऑक्टोबर) लिमोझिन आणि  एका गाडीची धडक झाली. या धडकेनंतर  वेगात असलेल्या लिमोझिनने रस्त्यावरील लोकांना चिरडले. अपघाताच्या वेळी रस्त्यावर अनेक जण उपस्थित असल्याने यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. अॅपल बॅरल या दुकानासमोर हा विचित्र अपघात झाला. दुकानाजवळ असलेल्या लोकांना गाडीने चिरडल्यामुळे जीवितहानी वाढल्याचं प्रत्यक्षदर्शींनी स्थानिक माध्यमांना सांगितलं. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. याआधी 2005 रोजी न्यूयॉर्कमध्ये असाच एक भीषण अपघात झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. 
 

Web Title: america limousine kills 20 in horrific accident at popular tourist spot of schoharie in new york say officials