"इराणमधील शाळेवरील हल्ल्यासाठी अमेरिका जबाबदार, कारण...; माजी CIA संचालकाचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:12 IST2026-03-12T13:10:17+5:302026-03-12T13:12:04+5:30
इराणमधील एका शाळेवर हवाई हल्ला करण्यात आला. हा हल्ला इराणनेच केला असावा, असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. पण, अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर यंत्रणेचे माजी संचालकांनी धक्कादायक विधान केले आहे.

"इराणमधील शाळेवरील हल्ल्यासाठी अमेरिका जबाबदार, कारण...; माजी CIA संचालकाचे मोठे विधान
इराणच्या मिनाब शहरातील एका मुलींच्या शाळेवर मिसाईल हल्ला केला गेला, ज्यात तब्बल १७५ जण मारले गेले. यात शाळेतील मुलींची संख्या जास्त होती. या हल्ल्याबद्दल बोलताना अमेरिकेच्या सीआयए अर्थात केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे माजी संचालक आणि अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे माजी कमांडर जनरल डेव्हिड पेट्रेयस यांनी मोठे विधान केले आहे. 'तो हल्ला अमेरिकेनेच केलेला असू शकतो, असे सांगत त्यांनी कारणही सांगितले आहे.
अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला केला. युद्ध सुरू झाल्यानंतर इराणमधील मिनाब शहरात असलेल्या एका मुलींच्या शाळेवर मिसाईल हल्ला केला गेला. यात १६८ मुलींसह १७५ जण मारले गेले. या घटनेनंतर जगभरात हळहळ आणि संताप व्यक्त करण्यात आला.
बीबीसी न्यूज वृत्तसंस्थेशी बोलताना अमेरिकेच्या सीआयए गुप्तचर यंत्रणेचे माजी संचालक पेट्रेयस म्हणाले की, 'मी तपासात दिसणारे पुरावे, थेट बघितलेले नाहीत. पण, हा हल्ला अमेरिकडेकडूनच केलेला असून शकतो. कारण या युद्धात टॉमहॉक मिसाईल फक्त अमेरिकेकडेच आहे.'
'अनेक वर्षांपूर्वी ही इमारत (जिथे आता शाळा होती) इराणी नौदलाचे एक मोठे तळ म्हणून वापरले जात होती', असेही त्यांनी सांगितले.
सीबीएस न्यूजच्या रिपोर्टनुसार अमेरिकेच्या प्राथमिक तपासात असेच संकेत मिळाले आहे की,अमेरिकाच जबाबदार असू शकते. रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की, शाळेवरील हल्ला जाणीवपूर्वक केला गेलेला नाही. चुकीमुळे शाळा मिसाईलच्या निशाण्यावर आली असावी.
न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या तपासात अशी माहिती समोर आली आहे की, मिनाबमधील शाळेवर झालेला मिसाईल हल्ल्यासाठी अमेरिकाच जबाबदार आहे. यात १७५ लोक मारले गेले. ठिकाण निवडताना झालेल्या चुकीमुळे हा हल्ला झाला होता. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या अधिकाऱ्यांनी हल्ला ज्या ठिकाणी मिसाईल हल्ला करायचा होता, ते ठरवण्यासाठी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणांच्या माहितीचा वापर केला होता.