शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

"त्यांची भारतात बिझनेस करण्याची इच्छा आहे, पण...!"; मोदी-मस्क भेटीवर हे काय बोलून गेले ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 03:34 IST

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मला माहीत आहे की, त्यांना भारतात बिझनेस करायचा आहे. पण..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी ब्लेअर हाऊस येथे स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांच्यासोबत चर्चा केली. या दोहोंमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यासंदर्भात बोलताना, "इलॉन मस्क पंतप्रधान मोदींना का भेटले हे आपल्याला माहीत आहे. त्यांना भारतात बिझनेस करायचा आहे," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मला माहीत आहे की, त्यांना भारतात बिझनेस करायचा आहे. पण व्यवसायासाठी भारत फार कठीण ठिकाण आहे. तेथे सर्वाधिक टॅरीफ (कर) आहे. बिझनेस करण्यासाठी ते एक कठीण ठिकाण आहे." खरे तर, आपली इंटरनेट सॅटेलाइट सर्व्हिस स्टारलिंक भारतात लॉन्च करण्याची इलॉन मस्क यांची इच्छा आहे. मात्र, त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. 

मस्क यांच्या भेटीनंतर काय म्हणाले मोदी? - मस्क यांच्या भेटीनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "वॉशिंगटन डीसीमध्ये इलॉन मस्क यांच्यासोबत चांगल्या प्रकारे बैठक पार पडली. आमच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यात मस्क यांच्या आवडीच्या, स्पेस, मोबिलिटी, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन आदी मुद्द्यांचा समावेश होता. याशिवाय मी सुधारणा आणि 'किमान सरकार, कमाल प्रशासना'च्या दिशेने भारताच्या प्रयत्नांवरही चर्चा केली."

कुटुंबीयांसह आले होते मस्क -यावेळी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क आपल्या कुटंबासह पोहोचले होते. ते आपल्या मुलांच्या हातात हात टाकून पंतप्रधआन मोदींच्या भेटीसाठी आले होते. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचे अत्यंत निकटवर्ती नेते विवेक रामास्वामी देखील पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी आले होते.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाbusinessव्यवसाय