कारभार हाती घेताच ट्रम्प यांनी केलं हे काम; जीव वाचवणारा 'मोहरा' झाला जगावर नजर ठेवणारा अमेरिकेचा 'चेहरा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:48 IST2025-01-21T14:41:24+5:302025-01-21T14:48:39+5:30
निवडणुकीवेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता, यावेळी सीन करन यांनी ट्रम्प यांचा जीव वाचवला होता.

कारभार हाती घेताच ट्रम्प यांनी केलं हे काम; जीव वाचवणारा 'मोहरा' झाला जगावर नजर ठेवणारा अमेरिकेचा 'चेहरा’
अमेरिकेत निवडणूक काळात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. सभेवेळी अचानक गोळीबार करण्यात आला होता, या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले होते. यावेळी सीन करन यांनी ट्रम्प यांचा जीव वाचवला होता. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीन करन यांना मोठं बक्षीस दिले आहे. अमेरिकन गुप्तचर सेवेचे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
"सिमेंट,बेसन, पाण्यालाही हलाल प्रमाणपत्र कसं देऊ शकता"; सुप्रीम कोर्टात तुषार मेहतांचा सवाल
हल्ला झाला त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांची ढाल म्हणून काम केले आणि ट्रम्प यांचे संरक्षण केले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी गेल्या वर्षभरापासून ट्रम्प यांचा बचाव करणारे सीन पेन यांच्या नामांकनाची घोषणा केली आहे.
ज्युनियर ट्रम्प यांनी शॉनचे कौतुक केले
सीन हे खरे अमेरिकन आणि देशभक्त आहेत. या पदावर राहण्यासाठी त्यांच्यापेक्षा चांगला दुसरा कोणी असू शकत नाही. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यापूर्वीही शॉनने त्यांची सुरक्षा वाढवण्याबद्दल बोलले होते., त्यावेळी एजन्सीने त्यांचे शब्द गांभीर्याने घेतले नाहीत, असंही ज्युनिअर ट्रम्प म्हणाले.
सीन यांना सिक्रेट सर्व्हिसचे डायरेक्टर बनवल्यानंतर बऱ्याच जणांनी टीका केली होती. ट्रम्प यांच्या या निर्णयावर रिपब्लिकन पक्षाचे सदस्यही प्रश्न उपस्थित करत आहेत. याचे नृतृत्व करायला त्यांना जमणार नाही, असं अनेकांनी म्हटले आहे.या कामाचा त्यांना अनुभव नाही. सिक्रेट सर्व्हिस ही अमेरिकेतील महत्त्वाच्या लोकांच्या लोकांना सुरक्षा देते.
१३ जुलै २०२४ रोजी एका रॅलीदरम्यान रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर, १५ सप्टेंबर २०२४ रोजी, फ्लोरिडा येथील त्यांच्या गोल्फ कोर्सवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा आणखी एक प्रयत्न झाला, तोही अयशस्वी झाला.