शौक बडी चीज है! अब्जाधीश जेफ बेजोस जीव धोक्यात घालून अंतराळात जाणार; म्हणे, बालपणीचे स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 02:54 PM2021-06-11T14:54:41+5:302021-06-11T15:00:29+5:30

Jeff Bezos is going to space: बेजोस यांची कंपनी ब्‍लू ओरिजिन गेल्या दशकभरापासून न्‍यू शेफर्ड रॉकेटवर मेहनत घेत आहे. भारताची अंतराळवीर कल्पना चावला यांचा परतत असताना अपघात झाला होता. यामुळे ब्लू ओरिजिन याची काळजी घेत आहे.

Amazon ceo, Billionaire Jeff Bezos is going to space for 11 minutes | शौक बडी चीज है! अब्जाधीश जेफ बेजोस जीव धोक्यात घालून अंतराळात जाणार; म्हणे, बालपणीचे स्वप्न

शौक बडी चीज है! अब्जाधीश जेफ बेजोस जीव धोक्यात घालून अंतराळात जाणार; म्हणे, बालपणीचे स्वप्न

Next

जगातील सर्वात मोठे अब्जाधीश आणि अ‍ॅमेझॉन कंपनीचे सीईओ जेफ बेजोस हे बालपणीचे स्वप्न साकार करण्यासाठी अंतराळाच्या प्रवासावर जाणार आहे. बेजोस त्यांचीच कंपनी 'ब्लू ओरिजिन'च्या रॉकेटमधून 20 जुलैला अंतराळाच्या प्रवासासाठी रवाना होणार आहेत. या प्रवासात बेजोस केवळ 11 मिनिटे अंतराळात राहणार आहे. 


बेजोस काय करू शकत नाहीत? त्यांच्याकडे 190 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. ते सुरफास्ट प्रायव्हेट जेटने जगभराची भ्रमंती करू शकतात, यॉटद्वारे समुद्रात फेरफटका मारू शकतात, मित्रांसोबत वेळ घालविण्यासाठी एक मोठेच्या मोठे बेटही खरेदी करू शकतात. मात्र, बेजोस यांना अंतराळाच्या प्रवासाला जायचे आहे. ही ११ मिनिटे एवढी धोकादायक आहेत, की त्यांचा जीवही जाऊ शकतो. (Jeff Bezos will go into space at the risk of his life; Say, childhood dream)


बेजोस यांची कंपनी ब्‍लू ओरिजिन गेल्या दशकभरापासून न्‍यू शेफर्ड रॉकेटवर मेहनत घेत आहे. भारताची अंतराळवीर कल्पना चावला यांचा परतत असताना अपघात झाला होता. यामुळे ब्लू ओरिजिन याची काळजी घेत आहे. या रॉकेटच्या खूप चाचण्य़ा घेण्यात आल्या आहेत. बेजोस आणि त्यांचे भाऊ मार्क बेजोस या रॉकेटने अंतराळ भ्रमंतीला जाणार आहेत. सीएनएनने याबाबतचे वृत्त दिले आहे. बेजोस आपला जीव धोक्यात घालून अंतराळात जाणार आहे.  बेजोस यांचे हे रॉकेट पृथ्वीपासून 100 किमी उंचीवरच जाणार आहे. ही अंतराळाची सुरुवात म्हटली जाते. 

बेजोस यांचे रॉकेट एका ठराविक अंतरावर बेजोस असलेल्या कॅप्सूलपासून वेगळे होणार आहे. हे कॅप्सूल स्वयंचलित आहे. त्याला पायलटची आवश्यकता नाही. गेल्या 15 टेस्टमध्ये या कॅप्सुलला कोणताही अपघात झालेला नाही. अंतराळात राहून पुन्हा पृथ्वीवर परतताना कक्षेत प्रवेश केल्यावर त्याचे तापमान 3500 डिग्री फॉरेनहाइट पर्यंत जाईल. यावेळी बेजोस यांच्यावर दबाव वाढणार आहे. तसेच वेगही प्रचंड असणार आहे. स्पेससूट घालण्याची आवश्यकता नाही तरीदेखील ऑक्सिजन कमतरता जाणवू लागली तर त्याची सोय करण्यात आलेली आहे. 
बेजोस 20 जुलैला अंतराळात रवाना होणार आहेत. हा तोच दिवस आहे जेव्हा अमेरिकेच्या अपोलो यानाने चंद्रावर पाऊल ठेवले होते. 

Web Title: Amazon ceo, Billionaire Jeff Bezos is going to space for 11 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.