शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

धमकीनंतर अमेरिकेत एक हजार शाळा बंद

By admin | Updated: December 16, 2015 01:37 IST

विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याचा संदेश मिळाल्यानंतर लॉस एंजिल्समधील एक हजाराहून अधिक शाळा मंगळवारी बंद करण्यात आल्या. या शाळांमध्ये ६,४०,००० विद्यार्थी आहेत.

लॉस एंजिल्स : विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याचा संदेश मिळाल्यानंतर लॉस एंजिल्समधील एक हजाराहून अधिक शाळा मंगळवारी बंद करण्यात आल्या. या शाळांमध्ये ६,४०,००० विद्यार्थी आहेत. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना असलेल्या धोक्याचे स्वरूप सांगितले नाही. मंगळवारी सकाळीच आमच्या शाळांच्या सुरक्षिततेला धोका असल्याचा संदेश इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आम्हाला मिळाला, असे येथील शाळांच्या पोलीस विभागाचे प्रमुख स्टिव्हन झिपरमन यांनी वार्ताहर परिषदेत सांगितले. आमच्या शाळांचा परिसर पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी खात्री पटेपर्यंत आज आम्ही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. पोलीस सर्व शाळांची झडती घेत आहेत. शाळा संचालक मंडळातील एका सदस्याला ई-मेलद्वारे मिळालेला हा संदेश परदेशातून आला असण्याची शक्यता आहे. मुस्लिम जोडप्याने कॅलिफोर्नियात १४ जणांचे हत्याकांड घडवून आणल्याच्या पार्श्वभूमीवर देशात अतिसतर्कता बाळगण्यात येत असताना हा संदेश प्राप्त झाला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत शाळा बंद केल्या. गतकाळात आणि अलीकडे काय घडले या आधारावर शाळा बंद करण्याचे प्रतिबंधात्मक पाऊल उचलणे आवश्यक होते, असे जिल्हा अधीक्षक रॅमन कोर्टीनेस यांनी सांगितले. धोक्याचा संदेश कोणा एका किंवा दोन-तीन शाळांसाठी नाही, तर अनेक शाळांसाठी होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा डोळ्यांसमोर ठेवून मी हा निर्णय घेतला, असे ते म्हणाले. दरम्यान, बॉम्बहल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर सॅन बर्नार्डिनो व्हॅली कॉलेजही मंगळवारी दुपारी बंद करण्यात आले.