नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 15:45 IST2025-09-22T15:45:24+5:302025-09-22T15:45:54+5:30
...मात्र नंतर, परिस्थिती बिघडली आणि आंदोलक व पोलीस यांच्यात हिंसक चकमकी झाल्या. ज्यात तब्बल ९५ पोलीस कर्मचारी जखमी झाली. यानंतर अनेकांची धरपकड करण्यात आली.

नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता फिलीपिन्समध्येही युवकांचा भ्रष्टाचाराविरोधातील राग उफाळून आला आहे. राजधानी मनीला येथे हजारो तरुणांनी पुरनियंत्रण प्रकल्पातील घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. हे आंदोलन सुरवातीला शांततेत सुरू होते. मात्र नंतर, परिस्थिती बिघडली आणि आंदोलक व पोलीस यांच्यात हिंसक चकमकी झाल्या. ज्यात तब्बल ९५ पोलीस कर्मचारी जखमी झाली. यानंतर अनेकांची धरपकड करण्यात आली.
या चकमक, अयाला ब्रिज, मेंडिओला आणि क्लारो एम. रेक्टो अव्हेन्यूसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी झाल्या. आंदोलकांनी पोलिसांवरही दगड, बाटल्या तसेच अत्याधुनिक शस्त्रांनीही हल्ले केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचाही वापर केला. महत्वाचे म्हणजे, नेपाळ, फ्रान्स व इंडोनेशियानंतर आता फिलिपिन्समध्येही सकारच्या भ्रष्टाचाराविरोधात जनतेमध्ये जनआक्रोश दिसून येत आहे.
२१६ जणांना अटक, यात ८९ अल्पवयीन -
गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१६ आंदोलकांना अटक करण्यात आली असून त्यांत १२७ तरुण आणि तब्बल ८९ अल्पवयीन आहेत. यासंदर्भात बोलताना मनीलाचे महापौर इस्को मोरेना म्हणाले, अटक झालेल्यांमध्ये १२ वर्षीय मुलाचाही समावेश आहे.
‘पररदेशातील घटना आणि रॅपरचा प्रभाव’ -
यासंदर्भात माहिती देताना राजधानी क्षेत्र पोलीस कार्यालयाचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल अँथनी एबेरिन म्हणाले, काही तरुण इतर देशांतील आंदोलनांमुळे प्रभावित झाले आहेत. तर काही एका लोकप्रिय रॅपरच्या विचारांनीही प्रवाभावित झाले आहेत, असे चौकशीतून समोर आले आहे.